मन



मन तरलते हळुवार
त्या एका झोक्यासवे
अलगद-अवचित
त्या मंद वाऱ्यासवे

कधी धुंद, मग्न अंतरी
कधी निर्भीड, शांत स्वच्छंदी
कधी घालमेल टोकाची
कधी फुगते, रुसते स्वतःशी

मन खुणावते हलकेच
त्या दूर नभाच्या गोष्टी
वास्तवाची जाणीव होताच
मधेच होते कष्टी

ती दुरदूरची स्वप्ने
मनाच्या वाटेवरची
नवी उमेद मज देती
लढण्याची, जगण्याची


- गौरी अजय चिंदरकर.
16/05/2016

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

दिल है छोटा सा, छोटी सी आशा !

रिहर्सल डायरीज #4 'बूज'च्या निमित्ताने…

रेषा