डॉ. काका !
डॉ . काका ! तशी आमची ओळख जूनीच . खरंतर मला आमची पहिली भेट आठवतही नाही , इतकी लहान होते मी . आठवणींच्या सिनेमाची negative film डोळ्यासमोरून फिरू लागते ती म्हणजे काकांच्या दवाखान्यापासून . स्थळ : रुपाली हॉस्पिटल , शिरगाव डॉ . काकांची दवाखान्यातली तपासणीची खोली . टेबल , खुर्ची आणि गळ्यात स्टेथोस्कोप घालून बसलेली मी . अविर्भाव असा की जणू काही मीच डॉक्टर आहे . कधी टेबलवर , कधी खुर्चीवर , कधी काकांच्या मांडीवर तर अगदी कधी काकांच्या खांद्यावर माझी स्वारी . काकांच्याच खिशातल्या पेनाने प्रिस्क्रिप्शनच्या कागदावर चार रेघोट्या ओढल्या म्हणजे ह्या डॉक्टरचं काम संपायचं ! खरंतर ही सुरुवात नसावी पण मला आठवते ती हीच . तर डॉ . काका ! मुळचे साताऱ्याचे , मुंबईत MBBS पूर्ण केलेलं आणि नंतर शिरगावात स्थिरावलेले . पेशाने डॉक्टर पण मनाने खरेखुरे कलाकार ! लहानपणी काकांकडून खुप गोष्टी ऐकल्या , त्यांच्यासोबत छान गाणी म्हटली पण मी जशी जशी मोठी होत गेले तसं काकांच्या व्यक्तिमत्वाचे वेगवेगळ...

Comments
Post a Comment