अनोळखी
अनोळखी ही नवी नाती
अनोळखी ह्या वाटेवरती
ओळखीचे सप्तसुरही
अनोळखी होऊन जगती
अनोळखी ह्या प्रश्नांची
पुन्हा शोधावी का नवी उत्तरे
स्वच्छ मोकळ्या आकाशालाही
अनोळखी हे ऋतु सारे
अवखळ अवचित धुंद क्षणांच्या
अनोळखी ह्या स्वप्नांचे
हवेहवेसे तरी अनोळखी
कधी गवसतील हे किनारे
एक प्रवास त्या ध्येयाचा
अनोळखी त्या रस्त्यावरती
तेच अनोळखी हे कवडसे
आता ओळखीचे होऊन जाती
- गौरी अजय चिंदरकर.
15/04/2017

Ek number
ReplyDeleteEk number
ReplyDeleteTHANK YOU ALL!!!
ReplyDelete