लिखाणाबद्दलचं 'लिखाण'



खूप दिवस काही लिहिलं नाही की एक वेगळीच तगमग सुरू होते मनात. काही तरी लिहिलं पाहिजे असं सतत वाटत राहतं आणि काय लिहावं हा प्रश्न सतावत राहतो.

खरंतर लिहीणं हे खूप जास्त विचार करून लिहीण्यापेक्षा ते सरळ सोप्पं त्या क्षणाला वाटेल तसं नैसर्गिक असावं असं मला नेहमी वाटतं... अगदी candid!

उगाच बढेजाव नाही, नाटकीपणा नाही, जे वाटलं ते सरळ-साध्या भाषेत कागदावर उतरवत जावं. कागदावर उतरवत असताना सुद्धा शेवट कधीच माहीत नसतो पण त्या शेवटाकडे चाललेला प्रवास मात्र खूप नव्या जाणीवा करून देत असतो.

जाणीव... मेंदूत चालू असलेल्या गुंतागुंतीची,
जाणीव... सतत चालू असलेल्या विचारचक्राची,
जाणीव... पटपट कागदावर उमटणाऱ्या अक्षरांची
आणि जाणीव... घडू पाहणाऱ्या नवनिर्मितीची!

ह्या लिखाणाचा प्रवास आणि आपला जगण्याचा प्रवास यात खूप साम्य जाणवत मला... उद्या काय आहे माहीत नाही... पण आज जे वाटतंय ते करून मोकळं व्हावं... होणाऱ्या चुका नंतर निस्तराव्यात, पण त्या क्षणाचा आनंद घ्यावा.

कशी गंमत असते ना, खूप दिवस विचार करून, एखादा विषय समजून-उमजून, त्यावर अभ्यास करून लिहिणं आणि सहज सुचलं च्या caption खाली बिनधास्तपणे लिहीत सुटणं. इथे कुठलीही बंधनं नसतात, ना शब्दांच्या मर्यादा, ना कोणाला आवडेल - न आवडेल याची भीती! मिळते एकचं गोष्ट... समाधान!
कदाचित असं लिखाण इतरांसाठी केलेलं नसेल पण स्वतःसाठी म्हणून काहीतरी केल्याचं समाधान यात असतं आणि सरतेशेवटी किंबहुना तेच जास्त महत्त्वाचं असतं.

फोटोग्राफरने सांगितलेली pose देऊन काढलेला फोटो, त्याच्या सूचनांप्रमाणे चेहऱ्यावर आणलेलं हसू, त्या एका क्लिकपुरतं मर्यादित असतं... पण असाचं एखादा निखळपणे हसताना नकळतपणे काढलेला फोटो त्या फोटोग्राफरला पण एक वेगळाचं आनंद देऊन जातो. ते हसणं प्रांजळपणे आलेलं असतं, अगदी मनापासून... ना कुठली adjustment, ना कुठलं दडपण... नकळत ते त्या फ्रेमची शोभा वाढवत असतं.

असचं निखळपणे लिहिता आलं पाहिजे, मनात चाललेले खेळ टिपता आले पाहिजेत - कुठल्याही दडपणाशिवाय, अगदी दिलखुलासपणे!

- गौरी अजय चिंदरकर
08/12/2019

Comments

  1. Mast , keep up the writing spirit!

    ReplyDelete
  2. निखळ, निरागस, सुंदर!

    ReplyDelete
  3. निखळ..अगदी पुलंसारखं

    ReplyDelete
  4. खुप छान मुक्ता! 👍
    असेच लिहित रहा, तसंही वाचन आणि लिखाण आजच्या पीढीसाठी दुर्मिळच!!

    नेहमी प्रमाणे तुझ्या प्रयत्नांना दाद द्यावी, हे खरेच!!👌

    ReplyDelete
  5. Likhana baddal chi aaturta..great!!!

    ReplyDelete
  6. मर्यादेला सुध्दा मर्यादा असतात ।। त्याचप्रमाणे किल्ल्यावर जर आपण कधी गेलो तर ऐक गोष्ट बघायला मिळते ।।
    भिंतीवर लिहू नकात ....... हे सांगायला सुद्धा आधी भिंतीवर लिहावे लागते !!!
    Social media mule likhanacha jamana halu halu gelaa !!!!
    Mhanunanch
    लिखाणाबद्दलसुद्धा आधी लिहावे लागते !!!!!
    Good topic Sis , keep it up !!!

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

दिल है छोटा सा, छोटी सी आशा !

रिहर्सल डायरीज #4 'बूज'च्या निमित्ताने…

बाईंचं अवकाश!