दिल है छोटा सा, छोटी सी आशा !
दिल है छोटा सा, छोटी सी आशा
मस्ती भरे मन की, भोली सी आशा
चाँद तारों को, छूने की आशा
आसमानों में उड़ने की आशा...
कुठेही हे गाणं कानावर पडलं किंवा सहज कधीतरी आठवलं तरी मन एकाच ठिकाणी जाऊन पोहोचतं ते म्हणजे पुण्याच्या गोसावी वस्ती मधलं समिधा सेंटर!
गेल्या वर्षी 'The Granny Cloud' ला १० वर्ष पूर्ण झाली त्या निमित्ताने पुण्यात सुनीता मावशींच्या घरी एक छोटंसं get together केलं. डॉ. शाहरुख हैदराबाद वरून आला होता, जिऊ पुण्यातचं होती आणि मी मुंबईवरून गेलेले, योगायोगाने Liz सुद्धा काही कारणाने भारतात आलेली. आम्ही सगळ्यांनी मिळून समिधा सेंटरमधल्या Granny Cloud सेंटर ला भेट दिली.
पुण्यासारख्या अर्बन शहरातला गोसावी वस्ती म्हणजे झोपडपट्टीचा परिसर. पण त्याच परिसरात एका दहा बाय दहा च्या खोलीत Granny Cloud चं सेंटर चालवलं जात होतं.
माझ्यासाठी SOLE आणि The Granny Cloud म्हणजे जिव्हाळ्याची गोष्ट!
पण मी अनुभवलेलं Granny Cloud म्हणजे एक स्वतंत्र इमारत, काचेच्या भिंती, त्यात लहान मुलांना आकर्षित करेल असं रंगीबेरंगी फर्निचर, खूप सारे कम्प्युटर्स आणि तेही इंटरनेट connection असलेले. (आता जरी इंटरनेट connection असणं सहज सोप्प झालं असलं तरी १०-११ वर्षांपूर्वी शिरगाव सारख्या ठिकाणी अनलिमिटेड इंटरनेट मिळणं म्हणजे एक luxury होती.)
तर गोसावी वस्तीतली परिस्थिती अगदी विरोधाभास निर्माण करणारी. छोटीशी दुकानवजा खोली, त्यात वरच्या खोलीत जाणारा लोखंडी जिना, एखाद-दुसरं कपाट, एक व्हाईटबोर्ड, एक laptop आणि co-ordinator च्या मोबाईल हॉटस्पॉट वरून चालणार इंटरनेट connection. बस्स एव्हढचं! हे सगळं दिसायला एव्हढसं असलं तरी त्यापलीकडे त्याचं छोट्याश्या खोलीत त्या मुलांनी स्वतःच असं एक छान विश्व तयार केलेलं. खोलीच्या भिंती वेगवेगळी चित्र, वर्तमानपत्रातली कात्रणं, छोट्या मोठ्या कागदी कलाकृतींनी सजवलेल्या होत्या. तिथल्या मुलांमधली शिकण्याची जिद्द, उत्सुकता टिकून होती.
आम्ही सगळे येणार म्हणून तिथल्या मुलांनी बरीच तयारी केलेली, छान नाटक बसवलेलं, आम्हाला द्यायला भेट म्हणून छोट्या छोट्या कागदी वस्तू, काही गाण्यांवर डान्स! तेव्हा तिथल्या मुलांनी 'दिल है छोटासा' ह्या गाण्यावर खूप छान डान्स केलेला. गाण्याचे समर्पक शब्द त्या सगळ्या परिस्थितीला साजेसे होते. अगदी २-३ वर्षांपासून ते १२-१४ वर्षांपर्यंतच्या वयोगटातली ती मुलं, त्यांना त्या गाण्याचा अर्थ माहीत असेल किंवा नसेल पण त्यांना ते सादर करताना पाहून माझ्या अंगावर काटा आला होता. इवली इवलीशी ती मुलं, त्यांच्या डोळ्यातली निरागसता, आजूबाजूच्या गोष्टी विसरून सादरीकरणामध्ये रमलेली! आहे त्या परिस्थितीत मिळणाऱ्या सोयीसुविधांचा शक्य तितका उपयोग करून घेऊन खुप मोठी स्वप्न बघण्याची आणि ती पूर्ण करण्यासाठी आकाशात उंच उडी घ्यायची त्यांची तयारी मला नेहमी नवीन ऊर्जा देत राहते.
त्या मुलांना सहानुभूती नको होती, प्रेरणा हवी होती, किंबहुना त्यांच्याकडे ती सुद्धा होती, फक्त त्या सगळ्यांना एक योग्य दिशा देण्याचं काम समिधा सेन्टर आणि The Granny cloud करत होतं.
Little hearts carry a little hope, let's keep that hope alive!
- गौरी अजय चिंदरकर
११/०७/२०२०
Just for reference –
The Granny Cloud – http://thegrannycloud.org/
SOLE (Now, School in the Cloud) - https://www.theschoolinthecloud.org/
Suneeta Kulkarni - Hon. Director,The Granny Cloud
Liz – One of the granny in The Granny Cloud
Dr. Shahrukh – Student of The Granny Cloud from Hyderabad
Jioo – Student of The Granny Cloud from Phaltan

Thanks for this, Gouri!
ReplyDeleteवा!फारच छान! दिल है 'छोटासा छोटीसी आशा' या आशा फुलविणे, पुरवणे, त्याला थोडीही दिशा देणे सारे महत्वाचे आहे.
DeleteWahhhh
ReplyDeleteसुंदर वर्णन.. & Hats off to The Granny Cloud team
ReplyDeleteThere are very few of such pure souls😍😍
ReplyDeleteखुप छान
ReplyDeleteGood to see you in manmukta after long time. Hope is the word in present time. I wish for the every growing child!
ReplyDeleteLet's keep that hope alive!
ReplyDeleteKhupch chaan 👍
ReplyDeleteसुंदर...♥️
ReplyDelete👌
ReplyDeleteMastch❤️
ReplyDeleteKhup sunder lihila ahes dear
ReplyDeleteLittle hearts carry a little hope, let's keep that hope alive!- good one gouri- pray for each & every children in india ,.
ReplyDeleteNice!!
ReplyDeleteThank you so much all :)
ReplyDeleteExcellent ❤️
ReplyDeleteअविस्मरणीय क्षण... सुंदर 👌
ReplyDeleteHope is the thing with feathers....it keeps everything alive...
ReplyDelete