Posts

चकवा!

Image
  सतत दिसत राहणारा तो एक ठिपका मन अस्वस्थ करत राहतो आणि आपल्याला काही कळायच्या आत आपण त्यावर क्लिक केलेली असते. शेकडो stories अश्याच पडलेल्या असतात. आपण जेव्हढ शक्य असले तेव्हढ्या वेगात क्लिक करत राहतो, फक्त तो एक ठिपका घालवण्यासाठी. आपलं लक्ष कुठेच नसतं, ना त्या story कडे, ना त्या story मधल्या कंटेंट कडे. शेवटी दमून कंटाळून ते तसचं अर्धवट टाकून बाहेर पडतो. त्या stories च्या दुनियेतून आणि समोर आ वासून उभी असते ती feed! काही वेळापूर्वी ज्या वेगात stories seen करण्यासाठी धडपडत असतो त्याच वेगात पुन्हा feed scroll करायला सुरुवात करतो. पुन्हा तेच, लक्ष नसतं त्या पोस्ट कडे, त्याच्या caption कडेही आणि कॉमेंट्स तर खूप आधीच दुर्लक्षित केलेल्या असतात. हे चालूच राहतं निरर्थक!  खरचं काही अर्थ आहे का ह्याला? एका ॲप वरून दुसऱ्या ॲपवर, बदललेला असतो तो फक्त इंटरफेस. पुन्हा scroll-click चा ससेमिरा चालूच राहतो. आपण गोल-गोल फिरतच राहतो. असंच तास- दोन तास घालवल्यावर लक्षात येतं किंबहुना ते आधीच आलेलं असतं पण आता जाणीव होते ती एकाद्या शारीरिक वेदनेची! गेल्या तासा- दोन तासात अख्खं जग फिरून आलेलो असतो. पण आप

कृष्णकिनारा!

Image
  कुठलंही पुस्तक वाचताना, त्यातले प्रसंग-व्यक्तिरेखा समजून घेताना आपण नकळत त्याची चित्रं डोळ्यासमोर तयार करत असतो. प्रत्येक व्यक्तिरेखेचं आपल्या मनात एक चित्र तयार झालेलं असतं. त्या व्यक्तीची वागणूक, बोलण्याची पद्धत ह्या सगळ्याचा अंदाज घ्यायचा प्रयत्न आपण करत राहतो. अगदी लहानपणापासून आपण रामायण, महाभारतातल्या गोष्टी वाचत-ऐकत आलोय. अगदी सगळ्या पुराणकाळातल्या प्रसंगाची चित्रवर्णन सुद्धा आपल्या डोळ्यासमोर येतात. मग त्यात सीतेचं अपहरण, जटायू युद्ध, हनुमानाने पेटवलेली लंका, ते अगदी द्रौपदीचं वस्त्रहरण, महाभारतातील युद्ध, कृष्णजन्म असे कितीतरी प्रसंग आपल्या बालपणीचा भाग असतात. अश्या बऱ्याचश्या गोष्टींमुळे त्या त्या व्यक्तींकडे बघण्याचा आपला एक दृष्टिकोन बनत गेलेला असतो. उदाहरणार्थ- कृष्ण, द्रौपदी, राधा, कुंती किंवा अगदी गांधारी! ही मोजकी नावं ह्यासाठी की हल्ली अरुणा ढेरे ह्यांचा कृष्णकिनारा हा कथा संग्रह वाचला. त्यात तीन कथा आहेत. पहिली राधेची, दुसरी कुंतीची आणि तिसरी द्रौपदीची! आपण कधीच न कल्पलेल्या गोष्टी वाचतो/ऐकतो आणि आतापर्यंत आपण जपलेली आपल्या मनातली एखादी व्यक्तिरेखा पूर्णपणे बदलून जा

प्रवास

Image
  नवीन दिवस उजाडतो आणि मावळतो, वर्ष सुरू होतं आणि संपत, आयुष्याचही तसचं काहीसं! प्रत्येकाचा प्रवास निराळा... प्रत्येकाची सुरुवात वेगळी आणि शेवटही! आणि गंमत म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी आपल्या हातात नसतात. पण ह्या दोन्ही गोष्टी जोडणारी अख्खी वाट कशी चालायची हे आपल्याच हातात असतं. ह्या सगळ्यामध्ये महत्वाची भूमिका बजावतो तो आपला दृष्टिकोन आणि त्याला अनुसरून केलेली मेहनत! ह्या दोघांची जोडगोळी प्रवासात असलेले अडथळे पार करायला मोलाची मदत करते. असाच कधीतरी कुठेतरी प्रवास करत असताना त्या त्या क्षणी मनात रेखाटलेली काही धावती विचारचक्र.   विंडो सीट लोकल मधली विंडो सीट मला मात्र नेहमीच एक खुप मोठा प्रश्न पाडते. एकमेकांसमोर तोंड करून असलेल्या लोकल मधल्या सीट्स, काही ट्रेन ज्या दिशेला चाललीय त्या दिशेला तोंड करून असलेल्या तर काही अगदी विरुद्ध दिशेला... त्यातली नक्की कोणती जागा पकडावी... ज्या दिशेने ट्रेन चाललीय त्या दिशेला बसून सरळ जगण्याचा आनंद घ्यावा ... सहज सोपं जसं आयुष्य नेतय तसं जात रहावं की विरुद्ध दिशेला बसून कापलेलं अंतर शांतपणे बघत बसावं... भूतकाळाला जास्त महत्त्व देऊ नये असं म्हणतात

तेरड्याच्या बिया

Image
लहानपणी पावसाळ्यात, शाळेतून घरी येताना रस्त्याच्या आजूबाजूला रुजलेल्या तेरड्याच्या बिया अलगद न फुटता काढून मग त्या मुद्दामहून फोडणे म्हणजे आवडीचा विरंगुळा. तेरड्याच्या बिया फोडल्यावर त्यांचा आकार म्हणजे कृष्णाने ज्या कालियामर्दनचा वध केलेला अगदी तसाच! काल-परवा रस्त्यावर फेरी मारत असताना तेरड्याची झाड पाहिल्यावर त्याच्या बिया काढून फोडण्याचा मोह आवरला नाही.  काही गोष्टी अशा असतात की त्या कधीच बदलत नाहीत. काही जागा, व्यक्ती आणि त्याच्याशी जोडल्या गेलेल्या आठवणी कितीही काळ लोटला तरी जशाच्या तशा डोळ्यासमोर उभ्या राहतात. मनात असलेली त्या गोष्टींसाठीची उत्सुकता कधीच कमी होत नाही. आपण वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास करत राहतो आणि आपला तो प्रवास अखंड चालूच असतो, आज इथे तर उद्या तिथे!  आपण राहिलेली घरं, जागा, तिथले रस्ते, माणसं मनात घर करून राहतात. त्या प्रत्येक रस्त्याला, जागेला आपला प्रवास माहिती असतो, ती जागा आपल्या प्रवासाचा एक अविभाज्य घटक असते. आपल्या आयुष्यात कमी जास्त प्रमाणात ती स्वतःचं महत्त्व टिकवून असते. पुन्हा कधी त्या ठिकाणी गेल्यावर तिथे आपण घालवलेल्या वेगवेगळ्या सुख-दुःखाच्या क्षणांची

दिल है छोटा सा, छोटी सी आशा !

Image
दिल है छोटा सा, छोटी सी आशा मस्ती भरे मन की, भोली सी आशा चाँद तारों को, छूने की आशा आसमानों में उड़ने की आशा... कुठेही हे गाणं कानावर पडलं किंवा सहज कधीतरी आठवलं तरी मन एकाच ठिकाणी जाऊन पोहोचतं ते म्हणजे पुण्याच्या गोसावी वस्ती मधलं समिधा सेंटर! गेल्या वर्षी 'The Granny Cloud' ला १० वर्ष पूर्ण झाली त्या निमित्ताने पुण्यात सुनीता मावशींच्या घरी एक छोटंसं get together केलं. डॉ. शाहरुख हैदराबाद वरून आला होता, जिऊ पुण्यातचं होती आणि मी मुंबईवरून गेलेले, योगायोगाने Liz सुद्धा काही कारणाने भारतात आलेली. आम्ही सगळ्यांनी मिळून समिधा सेंटरमधल्या Granny Cloud सेंटर ला भेट दिली. पुण्यासारख्या अर्बन शहरातला गोसावी वस्ती म्हणजे झोपडपट्टीचा परिसर. पण त्याच परिसरात एका दहा बाय दहा च्या खोलीत Granny Cloud चं सेंटर चालवलं जात होतं.  माझ्यासाठी SOLE आणि The Granny Cloud म्हणजे जिव्हाळ्याची गोष्ट! पण मी अनुभवलेलं Granny Cloud म्हणजे एक स्वतंत्र इमारत, काचेच्या भिंती, त्यात लहान मुलांना आकर्षित करेल असं रंगीबेरंगी फर्निचर, खूप सारे कम्प्युटर्स आणि तेही इंटरनेट connection असलेले. (आता जरी इंटरनेट co

बाईंचं अवकाश!

Image
खरं तर खूप काही वाचायचं असतं, वेगवेगळ्या विषयांवर, घटनांवर, माणसांवर पण ह्या न त्या कारणांमुळे राहून जातं. मग ह्यावर पर्याय मिळाला तो आता सहज उपलब्ध असणाऱ्या ऑडिओबुक्सचा. पुस्तक हातात घेऊन ते वाचणं, पान पलटणं, नवीन पुस्तकाचा सुगंध अश्या सगळ्याच सुखाचा आनंद मिळणं शक्य नव्हतं ह्या पर्यायामुळे पण करून बघू म्हणून एक पुस्तक वाचायला... खरंतर ऐकायला सुरुवात केली. सुरुवात एखाद्या मराठी पुस्तकाने करू असं आधीच ठरलेलं होतं. याच एक कारण म्हणजे खूप जास्त लक्ष देऊन ऐकावं लागणार नव्हतं. मातृभाषा ही कधीही, कितीही घाईत अगदी काम करता करता कानावर पडली तरी ती उमगत जाते, परिणाम घडवत जाते, शब्दांमागच्या भावभावना मनाच्या पटलावर उमटत जातात. तसं बघायला गेलं तर मी हा स्वतःवर केलेला एक प्रयोगचं होता. जसं काहीही लिहिताना मला कागद पेन जवळचं वाटतं तस वाचतानाही मला ई-बुक पेक्षा हाताला होणारा पुस्तकाचा स्पर्श आणि पुस्तक हातात घेऊन वाचण्याची पद्धतचं जास्त जवळची वाटते. हा प्रयोग एक वेगळा होता ह्याच मुख्य कारण म्हणजे मी वाचणार नव्हते तर ऐकणार होते... अख्खं पुस्तक! मग पहिलं पुस्तक म्हणून सुनीता देशपांडेचं '

लिखाणाबद्दलचं 'लिखाण'

Image
खूप दिवस काही लिहिलं नाही की एक वेगळीच तगमग सुरू होते मनात. काही तरी लिहिलं पाहिजे असं सतत वाटत राहतं आणि काय लिहावं हा प्रश्न सतावत राहतो. खरंतर लिहीणं हे खूप जास्त विचार करून लिहीण्यापेक्षा ते सरळ सोप्पं त्या क्षणाला वाटेल तसं नैसर्गिक असावं असं मला नेहमी वाटतं... अगदी candid! उगाच बढेजाव नाही, नाटकीपणा नाही, जे वाटलं ते सरळ-साध्या भाषेत कागदावर उतरवत जावं. कागदावर उतरवत असताना सुद्धा शेवट कधीच माहीत नसतो पण त्या शेवटाकडे चाललेला प्रवास मात्र खूप नव्या जाणीवा करून देत असतो. जाणीव... मेंदूत चालू असलेल्या गुंतागुंतीची, जाणीव... सतत चालू असलेल्या विचारचक्राची, जाणीव... पटपट कागदावर उमटणाऱ्या अक्षरांची आणि जाणीव... घडू पाहणाऱ्या नवनिर्मितीची! ह्या लिखाणाचा प्रवास आणि आपला जगण्याचा प्रवास यात खूप साम्य जाणवत मला... उद्या काय आहे माहीत नाही... पण आज जे वाटतंय ते करून मोकळं व्हावं... होणाऱ्या चुका नंतर निस्तराव्यात, पण त्या क्षणाचा आनंद घ्यावा. कशी गंमत असते ना, खूप दिवस विचार करून, एखादा विषय समजून-उमजून, त्यावर अभ्यास करून लिहिणं आणि सहज सुचलं च्या caption खाली बिनधास्