तेरड्याच्या बिया
लहानपणी पावसाळ्यात, शाळेतून घरी येताना रस्त्याच्या आजूबाजूला रुजलेल्या तेरड्याच्या बिया अलगद न फुटता काढून मग त्या मुद्दामहून फोडणे म्हणजे आवडीचा विरंगुळा. तेरड्याच्या बिया फोडल्यावर त्यांचा आकार म्हणजे कृष्णाने ज्या कालियामर्दनचा वध केलेला अगदी तसाच!
काल-परवा रस्त्यावर फेरी मारत असताना तेरड्याची झाड पाहिल्यावर त्याच्या बिया काढून फोडण्याचा मोह आवरला नाही.
काही गोष्टी अशा असतात की त्या कधीच बदलत नाहीत. काही जागा, व्यक्ती आणि त्याच्याशी जोडल्या गेलेल्या आठवणी कितीही काळ लोटला तरी जशाच्या तशा डोळ्यासमोर उभ्या राहतात. मनात असलेली त्या गोष्टींसाठीची उत्सुकता कधीच कमी होत नाही. आपण वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास करत राहतो आणि आपला तो प्रवास अखंड चालूच असतो, आज इथे तर उद्या तिथे!
आपण राहिलेली घरं, जागा, तिथले रस्ते, माणसं मनात घर करून राहतात. त्या प्रत्येक रस्त्याला, जागेला आपला प्रवास माहिती असतो, ती जागा आपल्या प्रवासाचा एक अविभाज्य घटक असते. आपल्या आयुष्यात कमी जास्त प्रमाणात ती स्वतःचं महत्त्व टिकवून असते. पुन्हा कधी त्या ठिकाणी गेल्यावर तिथे आपण घालवलेल्या वेगवेगळ्या सुख-दुःखाच्या क्षणांची जाणीव आपसूकच होते. काळाच्या ओघात आजूबाजूचा परिसर बदलला असला तरी आपण नकळत कुठेतरी ओळखीच्या खुणा शोधू लागतो आणि आपण शोधत असलेली नेमकी गोष्ट आपल्याला गवसते तेव्हा त्या क्षणाला आपण अनुभवत असलेला आनंद एक वेगळी सकारात्मकता देतो. चेहऱ्यावर आपोआप स्मितहास्य उमटतं.
अगदी छोट्या छोट्या गोष्टी नकळत आपल्या हातून होत असतात. लांब कुठेतरी वारकरी ठेका ऐकू आला की मन त्यावर दंग होऊन जातं.
ढोलताशे ऐकले की आपोआप मन मिरवणुकीत जातं, वरतीतला बँड ऐकला की पाय आपोआप ठेका धरू लागतात.
एखादं गाणं आपल्याला एखाद्या विशिष्ट प्रसंगाची आठवण करुन देतं.
एखादी वस्तू पाहिली की त्याच्याशी निगडीत गोष्ट आठवण्यात आपण रमून जातो.
एखादा फोटो आपण जगलेल्या सुंदर क्षणांची साक्ष देत दिमाखात उभा असतो.
असे अनेक छोटे-मोठे क्षण आपण जपत असतो.
अगोदर घडून गेलेल्या गोष्टींचा आपण कुठे ना कुठे संबंध लावत राहतो, त्या पुन्हा पुन्हा आठवून त्यातला ताजेपणा जपण्याचा प्रयत्न करत राहतो.
त्या आठवणींची शिदोरी हाती घेऊन पुढे पुढे चालत जाण्याचा प्रयत्न म्हणजेच मनुष्य स्वभावातली गंमत आहे असं मला नेहमी वाटतं.
चांगल्या गोष्टी सोबत घेऊन...
वाईट गोष्टींना सोडून देऊन...
चुकीच्या गोष्टीतून नवीन शिकत...
पडत-धडपडत पुढे चालत...
आपलं जीवनगाणं अजून समृद्ध करण्याचा प्रयत्न आपण करत राहतो.
- गौरी अजय चिंदरकर
२७/०९/२०२०

Old memories with soul beauti always remembered.
ReplyDeleteछान👏✊👍
ReplyDeleteSuperb. Really many a times we feel so elated when we observe smallest things which we had done in our childhood. Let's carry on with sweet memories and erase unwanted ones. Yehi hai Zindagi
ReplyDeleteKhupch cchan,sadhya terdyacha beecha khel Shreehan cha aasto👍😀
ReplyDeleteखूपच छान आहे
ReplyDeleteखूपच छान आहे
ReplyDeleteKhup chhan. . 😀
ReplyDeleteखुप छान लिहीलस, मलाही माझं बालपण आठवलं.
ReplyDeleteमाझ्या आठवणी जाग्या केल्यास.... खुप छान 😍😘❤️
ReplyDeleteगौरी ताई.... जबरदस्त
ReplyDeleteगौरी जाणिवेतून जगणे फार महत्त्वाचे असते.या छोट्या छोट्या घटना आठवणी, जाणिवा जगण्याची उमेद वाढवतात.👌👍
ReplyDeleteKhup chan
ReplyDeleteखूपच छान गौरी
ReplyDeleteखूप खूप छान मस्त वास्तव व चांगल्या पध्दतीने मांडले आहे
ReplyDeleteखूप सुंदर आणि मनातल लिहिलयस अगदी नावासारखच, मनमुक्ता.👌🏻👌🏻👌🏻
ReplyDeleteSuperb..U illuminates my childhood memories!!..
ReplyDeleteBharich
ReplyDeleteThank you all
ReplyDeleteCan only money buy happiness ?? Not at all
ReplyDeleteSuch a small childhood memories taught us good lesson !!!