कृष्णकिनारा!
कुठलंही पुस्तक वाचताना, त्यातले प्रसंग-व्यक्तिरेखा समजून घेताना आपण नकळत त्याची चित्रं डोळ्यासमोर तयार करत असतो. प्रत्येक व्यक्तिरेखेचं आपल्या मनात एक चित्र तयार झालेलं असतं. त्या व्यक्तीची वागणूक, बोलण्याची पद्धत ह्या सगळ्याचा अंदाज घ्यायचा प्रयत्न आपण करत राहतो.
अगदी लहानपणापासून आपण रामायण, महाभारतातल्या गोष्टी वाचत-ऐकत आलोय. अगदी सगळ्या पुराणकाळातल्या प्रसंगाची चित्रवर्णन सुद्धा आपल्या डोळ्यासमोर येतात. मग त्यात सीतेचं अपहरण, जटायू युद्ध, हनुमानाने पेटवलेली लंका, ते अगदी द्रौपदीचं वस्त्रहरण, महाभारतातील युद्ध, कृष्णजन्म असे कितीतरी प्रसंग आपल्या बालपणीचा भाग असतात.
अश्या बऱ्याचश्या गोष्टींमुळे त्या त्या व्यक्तींकडे बघण्याचा आपला एक दृष्टिकोन बनत गेलेला असतो. उदाहरणार्थ- कृष्ण, द्रौपदी, राधा, कुंती किंवा अगदी गांधारी!
ही मोजकी नावं ह्यासाठी की हल्ली अरुणा ढेरे ह्यांचा कृष्णकिनारा हा कथा संग्रह वाचला. त्यात तीन कथा आहेत. पहिली राधेची, दुसरी कुंतीची आणि तिसरी द्रौपदीची! आपण कधीच न कल्पलेल्या गोष्टी वाचतो/ऐकतो आणि आतापर्यंत आपण जपलेली आपल्या मनातली एखादी व्यक्तिरेखा पूर्णपणे बदलून जाते. काही गोष्टींकडे आपण वेगळ्या प्रकारे पाहू लागतो , एखाद्या छोट्या घटनेमागे लपून असलेला दृढ अर्थ आपल्याला जास्त भावतो.
ह्या तिन्ही गोष्टी आतापर्यंत वाचलेल्या गोष्टींपेक्षा अगदी वेगळ्या, खूप खोल अर्थ असणाऱ्या. अगदी गुंतवणारे संवाद, स्व कथन, आणि कधीच न अनुभवलेली नात्यांची गुंतागुंत!
काही व्यक्त काही अव्यक्त नाती, मनापासून जपलेली.
राधेतली प्रेयसी, द्रौपदीने मोठ्या जिकिरीने जोपासलेली पत्नी आणि कुंतीचं आईपण हे त्या त्या व्यक्तिरेखेच्या जीवनातले कंगोरे एक नवा विचार देतात.
तिघींचं दुःख वेगळं, पण वाट्याला आलेलं ते दुःख तिघीसुद्धा ज्या समजुतीने हाताळतात ती समजूत महत्त्वाची!
ह्या कथांमधला समान दुवा म्हणजे कृष्ण! राधा, कुंती आणि द्रौपदी, तिघींच्याही आयुष्यातलं त्याच स्थान भिन्न पण तितकंच महत्त्वाचं! प्रत्येकीला उमजलेला कृष्ण वेगळा आणि प्रत्येकीने त्याच्यासोबत जपलेलं नातं वेगळं, प्रत्येकीने वेळोवेळी कृष्णासोबत आपल्या बाईपणावरून घातलेले वाद-विवाद, प्रसंगी त्याला विचारलेले कठोर प्रश्नही वेगळे. ह्या सगळ्यांचं दुःख ओळखणारा कृष्ण तरीही त्या दुःखाची तीव्रता अनुभवण्यासाठी कृष्णाला एकदा तरी बाईचा जन्म घ्यावा लागणारच.
कृष्णकिनारा वाचल्यापासून त्यातल्या बऱ्याचश्या व्यक्तिरेखा पुन्हा मनात घर करून राहिल्यात, अगदी नव्याने!
धैर्य, समर्पण, त्याग, कर्तव्य ह्या सगळ्या मोठ्या मोठ्या शब्दांच्या पल्याड जाऊन एक व्यक्ती किंवा स्त्री म्हणून मांडलेली गोष्ट खूप भावते. समाजावर पूर्ण पुरुष किंवा स्त्री यांचं वर्चस्व न राहता, पृथ्वी आणि आकाशासारखं एक समतोल नातं कसं आणि कधी तयार होईल हा द्रौपदीने कृष्णाला केलेला प्रश्न मला ह्या पुस्तकाचं सार वाटतो.
अगदी आजही समाजात वावरताना आपण ह्या प्रश्नाचं उत्तरं शोधलं पाहिजे. काही गोष्टी फक्त नावापुरत्या किंवा घोषणा देण्याकरिता न राहता त्या विचार म्हणून कशा रुजवल्या जातील ह्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे.
-गौरी अजय चिंदरकर
21/08/2021

छान
ReplyDeleteखूप छान
ReplyDeletegauri mala he pustak hvy🤩
ReplyDeleteKhup chan
ReplyDeleteखुप सुंदर 👌👌
ReplyDeleteखूप छान
ReplyDeleteखूप छान
ReplyDeleteKhup chan
ReplyDeleteएकदम मस्त👌
ReplyDeletePerfectly summarised. Well done.
ReplyDeleteखूप छान👌
ReplyDeleteKhupch cchan!!
ReplyDeleteKrushnakinara vachayche vedh lagle...👍🏻👍🏻
ReplyDeleteSundar👌👌👌
ReplyDeleteअगदी अनादी काला पासून स्री आकाश आणि पृथ्वी मधला समतोल शोधत आली आहे...ते आज पर्यंत....खूप छान गौरी
ReplyDeleteChan Gouri
ReplyDeleteNicely explained all 3 Great Souls. Radha Kunti and Draupadi have their own inborn qualities. Keep it up Gauri
ReplyDeleteMasta! Loved reading it.
ReplyDeleteसुरेख😍👌🏻
ReplyDeleteसुंदर लेखणी गौरी.. आणि हा लेख वाचल्यावर पुस्तक वाचायला नक्की आवडेल...😀
ReplyDeleteसुरेखच म्हणाच!
ReplyDeleteखूप छान. विचार करायला लावणारा लेख.
ReplyDelete