पत्र


पत्र ! पूर्वीपासून चालत आलेलं आणि काळाच्या ओघात मागे पडलेलं संवादाच एक साधन, किंबहुना एक प्रभावी माध्यम.

फार पूर्वी राजे-महाराज्यांच्या काळात निरोप पोहोचवण्यासाठी खलिता पाठवत. दोन काठ्यांमध्ये कापड अडकवून त्यावर हस्तलिखित केलेला मजकुर म्हणजे अगदी 'रॉयल कारभार' !

त्यानंतरच्या काळात पत्रांचा नियमित वापर केला जाऊ लागला. घरी पत्र घेऊन येणाऱ्या पोस्टमनकाकांची आतुरतेने वाट बघितली जाऊ लागली. -१० दिवस हा साधारण पत्र पोहोचण्यासाठी लागणारा वेळ. पण किती उत्सुकता, कौतुक त्या पत्राचं. किती तो आनंद

कधी सुखाची तर कधी दुःखाची बातमी घेऊन येणारी ती पत्र, कधी कौटुंबिक तर कधी सामाजिक, कधी बाहेरगावी राहणाऱ्या कर्त्या पुरुषाने घरी लिहिलेलं खुशालीच पत्र तर कधी प्रेयसिने चोरून आपल्या प्रियकराला लिहिलेलं पत्र. जगाच्या पटलावरच्या वेगवेगळ्या व्यक्तिरेखा पण त्यांना जोडणारा त्यावेळच्या महत्वाचा दुवा म्हणजे पत्र!

हळूहळू नवे शोध लागत गेले आणि पत्र मागे पडू लागली. पत्रांची जागा मोबाईलने आणि त्याही पलीकडे जाऊन इलेक्ट्रॉनिक मेल , फेसबुक , व्हॉट्सअप ने घेतली.

घरी असलेली काही जुनी पत्र वाचनात आली. छान मांडणी केलेली ती आशयपूर्ण पत्र वाचली आणि लक्षात आलं की तेव्हा संवादाची साधन कमी असली तरी संवाद मात्र खूप चांगला व्हायचा. आताच्याच शब्दात सांगायच झाला तर 'अगदी healthy' ! आता रोज सकाळी संध्याकाळ hi- hello करून सुध्दा संवाद असा होतचं नाही.
आता सहसा पत्र लिहिणं होत नाही, त्यातही काही लिहिलेली पत्र डायरीत तशीच पडून राहतात किंवा अगदी कधीतरी त्या व्यक्तीच्या व्हॉट्सअपच्या पत्त्यावर जाऊन पडतात.

असंच त्यादिवशी फेसबूकवरती टाईमपास चालू होता आणि तेव्हढ्यात एक पोस्ट समोर आली. FutureMe: Write a letter to your future self, काहीतरी वेगळं वाटलं आणि गुगल वरती futureme चा शोध सुरू झाला. आणि जे शोधायचं होतं ते मिळालं. एक वेगळं पोस्ट ऑफिस, आपण आज पत्र लिहायचं, आपल्यालाच आणि ते आपल्याला मिळणार काही वर्षानंतर अर्थात तो वेळसुद्धा आपणच ठरवायचा ! पण हे पत्र मात्र आपल्या घराच्या पत्त्यावर येता Email च्या पोस्टात जाऊन पडणार. तिथे खूप सारी पत्र होती, काहींनी आठवणी लिहिल्या होत्या तर काहींनी आपली ध्येय. काहीजण स्वतःलाच धीर देताना दिसतात तर काही उत्स्फूर्तपणे स्वप्न लिहितात. काही फक्त स्वतःला पत्र लिहितात तर काही स्वतःला लिहिलेली पत्र इतरांना वाचण्यासाठी प्रसिध्द करतात पण ती निनावी असतात.

पत्र लिहिण्याचं स्वरूप जरी बदललं असलं तरी  भावना त्याच आहेत. त्यातला आनंद तोच आहे. असंच एक पत्र मीही आज लिहिलं, मलाच! पत्र लिहिणं म्हणजे outdated होत असताना नव्या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने पुन्हा तोच आनंद मिळवण्याचा एक छोटासा प्रयत्न!

- गौरी अजय चिंदरकर.
१६ / ११/ २०१७

Comments

  1. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  2. Kasa vatla te tula patrat lihun pathvto..Kay!!👌..
    Khup Chan,
    Aadhunik saadhnan mule,
    kaalachya oghat nisatlelya kahi gostinchi aathvn,tu karun dilis,aani tu detesach,aani punha ekda,maage pahnyachi chor-waat dhakhavlis tya sathi, thnx Gouri👌✌.

    ReplyDelete
  3. खूप छान मांडणी केली, सुंदर

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

दिल है छोटा सा, छोटी सी आशा !

रिहर्सल डायरीज #4 'बूज'च्या निमित्ताने…

रेषा