रिहर्सल डायरीज #1 डस्ट पार्टीकल्स
खिडकीतून किंवा कौलाच्या फटीतून घरात गुपचूप डोकावणारा उन्हाचा उबदार कवडसा , त्यात प्रवास करणारे असंख्य धुळीचे कण , प्रत्येक कणाची वेगळी गती , वेगळा मार्ग आणि दुसऱ्या कणाला त्रास न देता चालत राहण्याचा गुणधर्म ! खरंतर इतकी वर्ष इथे न तिथे तो कवडसा दिसतचं होता पण त्याचा इतका विचार , इतकं निरीक्षण कधी केलं गेलं नव्हतं . आज सकाळी खिडकीतून येणारे असे असंख्य प्रवासी पाहिले आणि त्यादिवशीच्या रिहर्सलची आठवण झाली . ठरल्याप्रमाणे आम्ही सगळे डॉ . काकांकडे जमलो . रोजच्या रिहर्सलची सुरुवात वेगळ्या प्रकारे होते , त्यादिवशी डस्ट पार्टीकल्स ह्या नवीन खेळाने झाली . त्यादिवशी काकांनी खेळाचे नियम सांगितले . ते काहीसे असे होते , काका गाणं म्हणणार आणि आम्ही त्यांच्या मागून गाणं म्हणत हॉलमधे चालायचं . चालताना गाण्याची लय पकडण्याचा प्रयत्न करायचा . आणि महत्वाचं म्हणजे आपल्याला हवं तसं फिरताना इतरांना स्पर्श होणार नाही ह्याची काळजी घ्यायची . थोडा वेळ ही गंमत अनुभवली . त्यादिवशी डस्ट ...