Posts

Showing posts from 2021

कृष्णकिनारा!

Image
  कुठलंही पुस्तक वाचताना, त्यातले प्रसंग-व्यक्तिरेखा समजून घेताना आपण नकळत त्याची चित्रं डोळ्यासमोर तयार करत असतो. प्रत्येक व्यक्तिरेखेचं आपल्या मनात एक चित्र तयार झालेलं असतं. त्या व्यक्तीची वागणूक, बोलण्याची पद्धत ह्या सगळ्याचा अंदाज घ्यायचा प्रयत्न आपण करत राहतो. अगदी लहानपणापासून आपण रामायण, महाभारतातल्या गोष्टी वाचत-ऐकत आलोय. अगदी सगळ्या पुराणकाळातल्या प्रसंगाची चित्रवर्णन सुद्धा आपल्या डोळ्यासमोर येतात. मग त्यात सीतेचं अपहरण, जटायू युद्ध, हनुमानाने पेटवलेली लंका, ते अगदी द्रौपदीचं वस्त्रहरण, महाभारतातील युद्ध, कृष्णजन्म असे कितीतरी प्रसंग आपल्या बालपणीचा भाग असतात. अश्या बऱ्याचश्या गोष्टींमुळे त्या त्या व्यक्तींकडे बघण्याचा आपला एक दृष्टिकोन बनत गेलेला असतो. उदाहरणार्थ- कृष्ण, द्रौपदी, राधा, कुंती किंवा अगदी गांधारी! ही मोजकी नावं ह्यासाठी की हल्ली अरुणा ढेरे ह्यांचा कृष्णकिनारा हा कथा संग्रह वाचला. त्यात तीन कथा आहेत. पहिली राधेची, दुसरी कुंतीची आणि तिसरी द्रौपदीची! आपण कधीच न कल्पलेल्या गोष्टी वाचतो/ऐकतो आणि आतापर्यंत आपण जपलेली आपल्या मनातली एखादी व्यक्तिरेखा पूर्णपणे बदलू...

प्रवास

Image
  नवीन दिवस उजाडतो आणि मावळतो, वर्ष सुरू होतं आणि संपत, आयुष्याचही तसचं काहीसं! प्रत्येकाचा प्रवास निराळा... प्रत्येकाची सुरुवात वेगळी आणि शेवटही! आणि गंमत म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी आपल्या हातात नसतात. पण ह्या दोन्ही गोष्टी जोडणारी अख्खी वाट कशी चालायची हे आपल्याच हातात असतं. ह्या सगळ्यामध्ये महत्वाची भूमिका बजावतो तो आपला दृष्टिकोन आणि त्याला अनुसरून केलेली मेहनत! ह्या दोघांची जोडगोळी प्रवासात असलेले अडथळे पार करायला मोलाची मदत करते. असाच कधीतरी कुठेतरी प्रवास करत असताना त्या त्या क्षणी मनात रेखाटलेली काही धावती विचारचक्र.   विंडो सीट लोकल मधली विंडो सीट मला मात्र नेहमीच एक खुप मोठा प्रश्न पाडते. एकमेकांसमोर तोंड करून असलेल्या लोकल मधल्या सीट्स, काही ट्रेन ज्या दिशेला चाललीय त्या दिशेला तों...