घाव
उसवण्याचे दुःख आता,
काही नवीन नाही
जोडणे पुन्हा नव्याने,
आता होणे नाही
काही नवीन नाही
जोडणे पुन्हा नव्याने,
आता होणे नाही
हुरहुर नेमकी ही,
उरी साठलेली
अस्वस्थता मनाच्या,
कोपऱ्यात दाटलेली
उरी साठलेली
अस्वस्थता मनाच्या,
कोपऱ्यात दाटलेली
संवाद केव्हढासा,
स्वतःशीच उमटलेला
हा प्रवास रोजचाच,
निःशब्द होत चाललेला
स्वतःशीच उमटलेला
हा प्रवास रोजचाच,
निःशब्द होत चाललेला
घालमेल ही तरी,
डोकावून पाहणारी
क्षितिजे हळवी तरी,
व्याकुळतेने डोलणारी
डोकावून पाहणारी
क्षितिजे हळवी तरी,
व्याकुळतेने डोलणारी
भास आभास सारे हे,
ठाव मनीचा नाही
पुन्हा पुन्हा सतावणारा,
हा घाव कोवळा नाही
ठाव मनीचा नाही
पुन्हा पुन्हा सतावणारा,
हा घाव कोवळा नाही
-गौरी अजय चिंदरकर
१६/०९/२०१९
१६/०९/२०१९
Grt...♥️
ReplyDelete😍
ReplyDelete👍👍sunder
DeleteSundar..keep it up👍
ReplyDeleteसुंदर 👌👌👍
ReplyDeleteChan 👌👌
ReplyDelete❤️
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteChan... 😍❤️
ReplyDeleteKhup chan lihites tu.
ReplyDeleteChhan ekdum 👌
ReplyDelete❤
ReplyDelete