जगणं!
खूप दिवसांपासून फोनच्या गॅलरीमधे पडून असलेला , साधारण वर्षभरापूर्वी विरार लोकलमधे काढलेला हा फोटो दिसला. ते समोरच्या सीटवर बसलेल्या आजींचे सुरकुतलेले हाथ अस्वस्थ करत होते... गुपचूप फोटो काढून पुढे कधीतरी यावर काहीतरी लिहू म्हणून फोनमधे जपून ठेवलेला तो फोटो. हातावरच्या सुरकुत्या त्यांच्या वयाची साक्ष देत होत्या. टापटीप नेसलेली साडी, हातातलं छानसं घड्याळ, शांतपणे हातावर हात ठेवून बसलेल्या आजींच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास त्यांचा चेहरा अजून खुलवत होता. शरीर थकलं असेल कदाचित पण त्यांच्याकडे बघून एक वेगळीच ऊर्जा मिळतं होती. कारण काहीही असो पण अगदी त्या वयातही विरार लोकलमधे, अगदी मुंबईच्या 'peak hours' मधे चढण्याच्या त्यांच्या हिंमतीचं कौतुक वाटलं.
नंतर विचार केला तर लक्षात आलं की ह्या आजी एकट्याचं नाहीयत... आजूबाजूला असे असंख्य आजी आजोबा आहेत ज्यांच्यासाठी वय हा फक्त एक आकडा आहे...
प्रत्येकाची जगण्याची कारणं वेगवेगळी आहेत...
कोणी रोजच्या जेवणासाठी कष्ट करतंय,
कोणी रिटायरमेंट नंतरचा वेळ घालवण्यासाठी तर कोणी शिकण्यासाठी...
होय, शिकण्यासाठी!
प्रत्येकाची जगण्याची कारणं वेगवेगळी आहेत...
कोणी रोजच्या जेवणासाठी कष्ट करतंय,
कोणी रिटायरमेंट नंतरचा वेळ घालवण्यासाठी तर कोणी शिकण्यासाठी...
होय, शिकण्यासाठी!
आयुष्यातल्या उतारवयातल्या टप्प्यावर सुद्धा शिकण्याची भूक शिल्लक असणारे असे बरेच विदयार्थी जगण्याच्या शाळेत शिकतायत आणि स्वतःच्या वागणुकीतून बाकीच्यांना शिकवतायत.
आधीच्या पिढीला पुढच्या पिढीला भरभरून द्यायचं असतं आणि त्यांच्याकडून सुद्धा खूप काही शिकायचं असतं. त्या देण्यामधे कुठेही मोठेपणा नसतो आणि घेण्यामधे कमीपणा! सगळं निस्वार्थी पणे चालू असते... अविरत!
पण मग इतक्या उत्साहीपणे वावरणाऱ्या ह्या चिरतरुण मंडळींना फक्त वय जास्त आहे म्हणून म्हातारं म्हणणं मला पूर्णपणे चुकीचं वाटतं. नवनवीन शिकण्याची मज्जा, छोट्या छोट्या गोष्टींमधून मिळणारा आनंद मिळवण्यासाठीची त्यांची धडपड किती सार्थ असते. कदाचित हेच जगण्याचं खरं तंत्र असावं आणि ते त्यांना उमगलं असावं.
त्यादिवशी त्या समोर बसलेल्या आजींनी नकळत ह्या सगळ्याबद्दल विचार करायला प्रवृत्त केलं. त्यांच्या प्रसन्न चेहऱ्यावर त्या अनुभवत असलेला आनंद व्यक्त होत होता. तो क्षण त्याच्यासाठी महत्त्वाचा असावा...
आयुष्यातले अनेक चढउतार पार केल्यावर, भविष्याचा विचार न करता आताचा क्षण कसा जगावा ह्याचं उत्तर त्यांच्याकडे असावं.
अश्या अनेक अवतीभवती भेटणाऱ्या अवलियांना सलाम! त्यांच्या जीवन जगण्याचा पद्धतीला सलाम!
आयुष्यातले अनेक चढउतार पार केल्यावर, भविष्याचा विचार न करता आताचा क्षण कसा जगावा ह्याचं उत्तर त्यांच्याकडे असावं.
अश्या अनेक अवतीभवती भेटणाऱ्या अवलियांना सलाम! त्यांच्या जीवन जगण्याचा पद्धतीला सलाम!
They may die of old age, but they die young!!!
- गौरी अजय चिंदरकर.
२१/०७/२०१९
२१/०७/२०१९

Sundar 👍
ReplyDeleteEkdam mast
ReplyDeleteGreat 👍
ReplyDeleteExcellent Gouri ! Keep it up!👍
ReplyDeleteएकाच या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मे मी .
ReplyDeleteExcellent , Keep it up !
ReplyDeleteMast👍
ReplyDelete1 number
ReplyDeleteKhoop chaan
ReplyDeleteBhareech!
ReplyDeleteKhup chhan ... Lihit Raha ...
ReplyDeleteKhup chaan gouri
ReplyDeleteअप्रतिम शब्दसंग्रह 👌
ReplyDeleteअतिशय सुंदर 👌👌
ReplyDeleteKhup sundar GOURI.
ReplyDeleteचिरतारुण्य हेच म्हणजे असेल
ReplyDeleteBhari 😍
ReplyDeleteKhup chhan😍
ReplyDelete