रिहर्सल डायरीज #4 'बूज'च्या निमित्ताने…
प्रत्येक गोष्टीची
एक प्रक्रिया
असते आणि
हीच प्रक्रिया
माणूस म्हणून
समृद्ध करत
असते. खरंतर
एखादी गोष्ट
आपण करतोय
तर त्याच
output हे महत्त्वाचं
असतंच पण
त्याहीपेक्षा त्या
output पर्यंत पोहोचण्याची
क्रिया-प्रकिया
सुद्धा खूप
महत्त्वाची असते.
ह्याच महिन्यात
'मित्र, शिरगाव'
ची 'बूज'
नावाची नाट्यकृती
तयार झाली
आणि पुणे,
कणकवली अशा
ठिकाणी प्रयोगसुद्धा
झाले. 'बूज'
च्या निमित्ताने
खूप वेगवेगळ्या
गोष्टी अनुभवल्या
त्याचाच हा
थोडक्यात केलेला
लेखाजोखा.
एक दिवस
अण्णा दादाचा
फोन आला,
खुल्या गटासाठी
एकांकिका बसवायची
आहे तूला
यायला जमेल
का ? आणि
इथूनच माझा
आणि बूज
चा प्रवास
सुरु झाला.
मित्र शिरगाव
म्हणजे माझं
दुसरं कुटुंब.
अगदी लहानपणापासून
म्हणजे मला
समजतही नव्हतं
अशा वयात
असतानापासून मित्र,
शिरगाव मधली
प्रत्येक व्यक्ती
तितकीच जवळची
आणि आपुलकीची
!
मग काय
एकदा एकांकिका
बसवायची ठरली
आणि मग
रिहर्सलला सुरुवात
झाली. रोज
संध्याकाळी डॉ.
काकांचं घर
गाठायचं आणि
मग रिहर्सल
सुरु.
सुरुवातीच्या काही
रिहर्सलना शब्दवेध,
डस्ट पार्टीकल
सारखे खेळ,
विषयांवर नाटक,
इकडच्या तिकडच्या
गप्पा, एखादं
दुसरं पुस्तकवाचन
अशा गोष्टी
घडतच होत्या.
पुढे जसं
जसं विषय
ठरत गेला,
पात्र ठरत
गेली, कथानकाची
रूपरेषा स्पष्ट
होतं गेली
तशी त्यादृष्टीने
चर्चा, घटना,
पुस्तकवाचन यामधून
विषयाचा सखोल
अभ्यास होऊ
लागला.
महाभारतावरील बऱ्याच
पुस्तकांचं थोडंफार
वाचन झालं,
त्यात पर्व,
जय, युगांत
सारखी पुस्तकं,
तर कधी
राणी ताई
आणि डॉ.
काकांनी समजावून
सांगितलेल्या अनेक
गोष्टी. पौराणिक
गोष्टींवर वैज्ञानिक
दृष्टिकोनातुन केलेल्या
चर्चा, प्रश्न
उत्तरे, महाभारत
समजुन घेण्याचा
केलेला प्रयत्न.
तसंच सायबर
संदर्भात कधी अमानने
तर कधी
मी समजावून
सांगितलेल्या सायबर
security च्या संकल्पना
तर कधी
करून दाखवलेली
छोटी छोटी
प्रात्याक्षिक. स्री
पुरुष समानतेवर
झालेल्या सकस
चर्चा. त्या
नुसत्या चर्चा
न राहता
ते विचार
मनावर कोरले
गेले. कदाचित
हेच egalitarian वृत्तीच्या दृष्टीने
पडलेलं पहिलं
पाऊल असेल.
अभि या
नव्या मित्राने
तर त्याच्या
आवाजाने जादू
केली होती
इतकी की
अगदी लहान
मुलं सुद्धा
त्याच्यामुळे सय्या
सारखी गाणी
म्हणू लागली.
अभि मात्र
आमच्या सगळ्यांच्या
चिडवण्याने पार
हैराण झाला
होता.
हळूहळू नाटक
आकार घेत
होतं. रिहर्सल
ची वेळ
सुद्धा वाढत
होती. रोज
रात्री १-२ वाजेपर्यंत आमचा
मुक्काम डॉ.
काकांच्या घरी
असायचा. इथे
सगळ्यात महत्त्वाचं
म्हणजे रोज
मला नाना
दादा इतक्या
उशिरा घरी
सोडायला यायचा.
रोज रात्री
माझी आणि
नाना दादाची
बुलेट सफारी
अगदी न
चुकता व्हायची.
नाना दादाचे
जाहीर आभार,
त्याच्यामुळे मी
बूज चा
हिस्सा होऊ
शकले. शेवटचे
१०-१२
दिवस तर
माझा मुक्काम
डॉ.काकांच्या
घरी. रोज
रात्री रिहर्सल
संपल्यावर मी,
अभि आणि
डॉ. काका
असा आमचा
मेळ जमायचा
तो थेट
पहाटे ४-५ पर्यंत. रात्री
केलेलं स्क्रिप्टचं
लिखाण, अभि
आदित्यची रंगलेली
मैफिल, डॉ.
काकांनी काढलेली
चित्र, झोप
उडवण्यासाठी फ्रिजमधले
संपवलेले काजू
आणि ४
वाजता गच्चीवर
जाऊन केलेलं
आकाशदर्शन! नुकतीच
थंडी पडायला
सुरुवात झालेली.
तो हवेतला
गारवा, पानांची
ऐकू येणारी
सळसळ, सर्वत्र
शांतता आणि
अशा वेळी
गच्चीवरून आकाशात
पाहताना एक
वेगळा आनंद
मनात साठत
होता. तितक्याच
उत्सुकतेने समजून
घेतलेलं आकाश
कायम लक्षात
राहिलं.
सप्तऋषी, स्वाती,
चित्रा, विशाखा,
मृग, कर्क,
सिंह, ध्रुवतारा,
स्वर्गाचं दार
आणि बरंच
काही!
मित्र शिरगाव
आणि खाण्याचं
अगदी जवळचं
नातं! रिहर्सलच्या
निमित्ताने रोज
चहा - कॉफी
असायचीच पण
त्याचसोबत कधी
कधी रात्री
अपरात्री खाल्लेली
मिसळ, दाबेली,
स्ट्रॉबेरी शेक,
चिकू शेक,
वडापाव, समोसा,
केक म्हणजे
पर्वणी! सर्व
खवय्यांच्या मान
ठेवून त्यांचं
उदर यथोचित
भरण्याचं काम
मालन काकी
आणि डोर्ले
काकींनी आनंदाने
केलं.
सचिन दादाची
बोलण्याची शैली,
त्याच्या नाटकातल्या
दिग्दर्शकावरून झालेल्या
गमतीजमती, व्यासोच्छिष्ट
जगत सर्वम्
चा सगळीकडे
पुन्हा पुन्हा
लागणारा संदर्भ
आणि त्यावर
नाना दादाच्या
आपटेने दिलेलं
उत्तर, सगळचं
एकदम भारी!
प्रिती आणि
भाग्यश्रीचं गुळपीठ,
ओंकारचं बोलणं
आणि मैत्रीण
स्वराचं हसणं
सगळं अगदी
सगळं मनात
ठासून भरलंय.
'बूज' तयार झाली,
सादरीकरण झालं,
बऱ्याच चांगल्या
प्रतिक्रिया सुद्धा
मिळाल्या. नाटक
पूर्ण झालं,
सादर झालं
याचा आनंद
आहेच पण
त्यासोबतचं एक
नाट्यनिर्मिती मी
शून्यापासून अनुभवली
याचं समाधान
आहे.
'बूज' च्या निमित्ताने
बऱ्याच नव्या
गोष्टी शिकता
आल्या, अनुभवता
आल्या आणि
हाच अनुभव
एक माणूस
म्हणून खऱ्या
अर्थाने समृद्ध
करणारा ठरला,
ठरतोय!
- गौरी अजय चिंदरकर
३०/१२/२०१७

Superb.....
ReplyDeletethank you :)
DeleteBharich
ReplyDeleteThank you dada :)
DeleteAwesome writing..A Story teller
ReplyDeleteThank you Sir :)
DeleteTuzya phudil vatchalin sathi hardik Hardik subhechaa,kash aamhala pn hya natyacha prayog pahnyachi sadhi milali asti....
ReplyDeleteAll the best ,keep it up...✌
Thank you so much UAB :)
DeleteKadak👌👌
ReplyDeleteThank you so much :)
DeleteMast
ReplyDeleteThank you so much :)
DeleteThis comment has been removed by the author.
Delete