स्लॅमबुक



असं म्हणतात की, काही गोष्टी ह्या रात्रीच्या निरव शांततेत लिहायच्या असतात. हीच शांतता थेट हृदयाला जाऊन स्पर्श करते. मेंदूच्या गुंतागुंतीच्या तर्क-वितर्कांना जरा बाजूला ठेवून मनातल्या गोष्टींना व्यक्त होण्याची संधी देते. रोजच्या जीवनात बऱ्याच गोष्टी घडत असतात पण त्यातही काही गोष्टी, माणसं लक्षात राहतात खूप चांगल्या आठवणींच्या स्वरूपात. अश्याच आठवणींचा खजिना म्हणजे 'स्लॅमबुक'.


आज कपाट आवरताना जुनी स्लॅमबुक सापडली. जुनी म्हणजे तशी फार जुनी नाही पण - वर्षांपूर्वी बनवलेली. मी एक जुन्या डायरीचं स्लॅमबुक मध्ये रूपांतर केलेलं. आधी ती बघून मलाच रा हसू आलं. आपली डायरी सगळ्यात जास्त भरली पाहिजे म्हणून काही जणांकडून अगदी जबरदस्तीने भरून घेतलेली माहिती होती त्यात. पण त्याहून भारी म्हणजे काही जणांनी अगदी मनापासून मनमोकळेपणाने लिहिलेलं खूप काही सापडलं.


स्लॅमबुक मधल्या वेगवेगळ्या मुद्द्यावर सगळ्यांनी लिहिलेली उत्तरं, कविता, चांगले विचार सगळं पुन्हा वाचताना खूप मज्जा येत होती.आपलं नाव, गाव, पत्ता, आवडत्या गोष्टी, जीवनाविषयी, माझ्याविषयी खोडकरपणे दिलेली उत्तरं वाचून हसू येत होतं.


गंमत म्हणजे त्यात बऱ्याचशा अश्या व्यक्तींची माहिती होती की ज्यांचा मला आता चेहराही आठवत नाही. मग एक वेगळा शोध सुरू झाला. त्या व्यक्ती आधी Facebook वर आहेत का हे पाहिलं, मग जुने मोबाईल नंबर अस्तित्वात आहेत का हे तपासलं, दुसर्या कोणाकडून काही माहिती मिळतेय का ते पाहिलं पण हाती जास्त काही लागलं नाही. पण हा शोध सुरूच राहिलं.


आता संपर्कात असलेल्या मित्रमैत्रिणींना फोन केले खूप छान वाटलं. काळाच्या ओघात नवी माणसं मिळत जातात पण काही जुनी नाती हृदयाच्या कप्प्यात जपून ठेवलेली असतात. स्लॅमबुक वाचता वाचता कधीतरी असं वाटत होतं की कसे होतो ना आपण !


आता सहसा स्लॅमबुक पाहायला मिळत नाही किंवा कोणी इतके कष्ट घेत नाही पण काय भारी गोष्ट आहे स्लॅमबुक- ज्या गोष्टी बोलून दाखवता येत नाहीत अश्या गोष्टी लिहून दुसर्यापर्यंत पोहोचवायाच्या, कधी उघड-उघडं चूक कबूल करून माफी मागायची तर कधी मनभरून कौतुक करायचं, कधी छोट्या छोट्या गंमती सांगायच्या तर कधी हसत हसत सल्ले द्यायचे, किती भारी !


माझ्या अतिशय प्रिय व्यक्तीने स्लॅमबुक मध्ये लिहिलेली अशीच एक गोष्ट-

जस्ट डू ईट !
आज, आता आपण कुणीच नसू.
आपल्या हातात काहीच नसेल.
पण म्हणून रडत बसून कसं चालेल ?
कुणी मदतीला येईल, हात देईल म्हणून वाट बघत बसण्याऐवजी आपण आपल्याच पंखातल्या चिमुकल्या बळावर विश्वास ठेवला तर?
आपल्या आपल्या ताकदीने थेट उडायलाच केली सुरुवात... तर ?
सारे संकेत, सारी बंधने मोडून तोडून आपणच शोधली आपली वाट... तर ?
अशी वाट शोधता येते?
-येते !
कुणालाही !


आणि ह्यासोबत एक सुंदर मोरपीस !
प्रयत्न कर एव्हढा छोटासा संदेश पण किती सुंदर पद्धतीने मांडलेला.


अश्याच असंख्य आठवणींचा खजिना मूर्त स्वरूपात आपल्यासोबत आहे हीच किती छान गोष्ट आहे.


आता असंच एक छानसं स्लॅमबुक पुन्हा बनवायला हवं अश्याच खूप साऱ्या आठवणी साठवण्यासाठी !

-गौरी अजय चिंदरकर.
/११/२०१७

Comments

  1. मस्त गौरी.. छान लिहिलंयस.. माझ्याही स्लॅमबुकच्या आठवणी जागा झाल्या..☺️

    ReplyDelete
  2. Khup chan...Junya aathavani jagya zalya... Missing those days

    ReplyDelete
  3. Nice one and thanks for remembering slam book.....

    ReplyDelete
  4. Beautifully expressed Gouri Chindarkar

    ReplyDelete
  5. गौरी खूप खूप छान मांडणी ,मनाला खूप भावली , असेच चागलं चांगलं लिहीत जा. वाचायला नक्कीच आवडेल

    ReplyDelete
  6. एका डोळ्याचं हसरं मोरपिस..
    कुठल्या रानातल्‍या बरं ?
    कुणा मोराचं असेल ?

    कुणाचा शब्द मोरपिस होत
    कुणाच्या डायरीत
    कधी कुणा दिसेल ?

    कुणाच्या आठवणीने
    कधी कुणी
    गालात हसेल ?

    ReplyDelete
  7. Old memories touch the heart Gouri...
    👌😍😇
    Slambook, apne logo ki apne or aapke baare me likhi jaane wali secret baate,or wo baate dosto se jyada hum kisse share karte nahi aissi chand baate,or wo yaade dil ko firse chote hone per majbur karti he,dosto ki yaad aati he,slambook chupake rakhne ki jagah dikhai deti he, or bohot kuch yaad karne per majbur karti he...

    Thnx Gouri firse wo yaado me khumne ka mokka dilane ke liye....

    All the best for next👍

    I'm looking forward to u r next ✌👌😎

    ReplyDelete
  8. खूपच छान आहे गौरी. ...या निमित्ताने अडगळीतली slambook पुन्हा चाळली गेली..😊😊 बर् या च जुन्या गोष्टी नव्याने आठवल्या. ..
    Thanks for that..

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

दिल है छोटा सा, छोटी सी आशा !

रिहर्सल डायरीज #4 'बूज'च्या निमित्ताने…

रेषा