Posts

सायकल

Image
भस्सकन कागद ओढवा... हाताला मिळेल ते पेन घेऊन घासाघीस सुरू करावी. डोक्यातल्या, मनातल्या, हृदयातल्या असंख्य अव्यक्त भावना आपल्याला काही समजण्यापूर्वीच कागदावर जाऊन चिकटाव्यात. नेहमी काय लिहावं हा मोठा प्रश्न पडत असतो पण पुढे लिखाण कोणत्या दिशेने घेऊन जावं हा साधा विचारही न करता जे वाटेल ते फक्त लिहत सुटावं... व्यक्त व्हावं... मोकळं व्हावं... असं फार कमी वेळा होतं. आजही तसंच काहीसं दिशाहीन... संदीप खरे आणि सलील कुलकर्णी ह्यांचा प्रमुख पाहुणे म्हणून समावेश असलेला 'सूर नवा ध्यास नवा ' च्या एक भागाचा व्हिडिओ पाहिला. एक भावनांवर प्रेम करणारा मनुष्य तर दुसरा शब्दांना धरून सूर लावणारा... ( अर्थात हेही संदीप खरेंच्या शब्दात) आणि त्यातही संदीप खरेंनी सादर केलेली 'सायकल' ही कविता. एका बापाचं भावविश्व संदीप नेहमीच त्याच्या कवितेतून मांडत आलाय. प्रत्येक वेळी ते भिडतं आणि अभिप्राय म्हणून दोनच गोष्टी होतात, एक म्हणजे डोळ्यातून वाहणारी आसवं आणि दुसरी म्हणजे निशब्दता! आपोआप बॅक ऑफ द माईंड विचारचक्र सुरू होतात.कवितेतील चपखल शब्द त्रास देतातच पण त्याहूनही जास्त विचार करायला ...

लम्हा

आज एक लम्हा गुजरा  खामोशियोंको लेकर खामोशिया थी... फिर भी  मन की बुलंद आवाज़ कुछ कहा करती थीं तआकूब करना था उस मंज़िल को जो ख़्वाबोंमे भी आती थी मुसाफ़िर की सफर ने  सब्र करने का फैसला लिया था कठिनाईयां बहुत थी  लेकिन हौसला नही हारा था इन्तजार था उसी लम्हे का  जिसकी दिलसे गुज़ारिश थी जो दिल चाहा वो पाने की उसी खामोशियोंमें ताकद थी - गौरी अजय चिंदरकर ०१/०८/२०१८

मुस्कान

सोचा कुछ यूहीं दुनिया की सैर कर लेते हैं देखा तो ज़िंदगी ने दुनिया दिखाई है कुछ मतलबी अंदाज हमेशा नजर आए हैं कुछ पुराने लम्हे बिन बुलाए सामने आए है अल्फाज से बने वादे अचानक से डगमगाने जो लगे है  दिल के अरमान कुछ अंधुक से दिख रहे हैं कसमोंसे जुड़े रिश्ते फिर भी आपस में गुनगुना रहे हैं मुझे ही मेरे ख्वाबिदा होने का एहसास दिला रहे है सामने खडे मंझिलने गिरते हुए भी चलने को मजबूर किया है फिरसे उसी उम्मीद से दौड़ लगाने को कहा हैं बहुत मुश्किलों से ये दर्या राह दिखा रहा है शायद आज मेरी मेहनत रंग लायी हैं जिंदगी ने चलते चलते दुनिया दिखाई हैं जाते जाते इसी सफर ने बस्स एक मुस्कान छोड़ने कही हैं - गौरी अजय चिंदरकर २१/०५/२०१८

बातें

कुछ ऐसी बातें होती हैं जो दिलके बहुत पास होतीं हैं सुकुन तो तब मिलता हैं जब वो खयालोंमे भी आती हैं कुछ ऐसी बातें होती हैं जो खयालोंसे ख्वाहिश बन जाती हैं और मजा तो तब आता हैं जब बिना कोई अल्फाज कहें ख्वाहिशें हकीकत मैं बदल जाती हैं। -गौरी २८/०३/२०१८

रंग आकाशाचे...

Image
मी गावात वाढलेली आणि त्यातही मुख्य गावापासून ३ - ४ किलोमीटर अंतरावर माझं घर . आजूबाजूला घरांची जास्त दाटीवाटी नाही . प्रसन्न शांतता , अंगणात उभं राहिल्यावर दूरवर दिसणारा परिसर . दूर डोंगरावर असलेल्या आंब्याच्या बागा , गावाला जोडणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेला काळा दगड , हळूच माडाच्या झाडाआड लपलेलं दूरवर दिसणारं एखाद दुसरं घर , रस्ता जास्त रहदारीचा नसल्याने कधीतरी जाणारी वाहनं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दिवसरात्र दिसणारं मोकळं विस्तीर्ण आकाश .                                                                             सकाळी घरासमोरून उदयाला ...

डॉ. काका !

Image
डॉ . काका ! तशी आमची ओळख जूनीच . खरंतर मला आमची पहिली भेट आठवतही नाही , इतकी लहान होते मी . आठवणींच्या सिनेमाची negative film डोळ्यासमोरून फिरू लागते ती म्हणजे काकांच्या दवाखान्यापासून . स्थळ : रुपाली हॉस्पिटल , शिरगाव डॉ . काकांची दवाखान्यातली तपासणीची खोली . टेबल , खुर्ची आणि गळ्यात स्टेथोस्कोप घालून बसलेली मी . अविर्भाव असा की जणू काही मीच डॉक्टर आहे . कधी टेबलवर , कधी खुर्चीवर , कधी काकांच्या मांडीवर तर अगदी कधी काकांच्या खांद्यावर माझी स्वारी . काकांच्याच खिशातल्या पेनाने प्रिस्क्रिप्शनच्या कागदावर चार रेघोट्या ओढल्या म्हणजे ह्या डॉक्टरचं काम संपायचं ! खरंतर ही सुरुवात नसावी पण मला आठवते ती हीच . तर डॉ . काका ! मुळचे साताऱ्याचे , मुंबईत MBBS पूर्ण केलेलं आणि नंतर शिरगावात स्थिरावलेले . पेशाने डॉक्टर पण मनाने खरेखुरे कलाकार ! लहानपणी काकांकडून खुप गोष्टी ऐकल्या , त्यांच्यासोबत छान गाणी म्हटली पण मी जशी जशी मोठी होत गेले तसं काकांच्या व्यक्तिमत्वाचे वेगवेगळ...

रिहर्सल डायरीज #4 'बूज'च्या निमित्ताने…

Image
प्रत्येक गोष्टीची एक प्रक्रिया असते आणि हीच प्रक्रिया माणूस म्हणून समृद्ध करत असते . खरंतर एखादी गोष्ट आपण करतोय तर त्याच output हे महत्त्वाचं असतंच पण त्याहीपेक्षा त्या output पर्यंत पोहोचण्याची क्रिया - प्रकिया सुद्धा खूप महत्त्वाची असते . ह्याच महिन्यात ' मित्र , शिरगाव ' ची ' बूज ' नावाची नाट्यकृती तयार झाली आणि पुणे , कणकवली अशा ठिकाणी प्रयोगसुद्धा झाले . ' बूज ' च्या निमित्ताने खूप वेगवेगळ्या गोष्टी अनुभवल्या त्याचाच हा थोडक्यात केलेला लेखाजोखा . एक दिवस अण्णा दादाचा फोन आला , खुल्या गटासाठी एकांकिका बसवायची आहे तूला यायला जमेल का ? आणि इथूनच माझा आणि बूज चा प्रवास सुरु झाला . मित्र शिरगाव म्हणजे माझं दुसरं कुटुंब . अगदी लहानपणापासून म्हणजे मला समजतही नव्हतं अशा वयात असतानापासून मित्र , शिरगाव मधली प्रत्येक व्यक्ती तितकीच जवळची आणि आपुलकीची ! मग काय एकदा एकांकिका बसवायची ठरली आणि मग रिहर्सलला सुरुवात झाली . रोज संध्याकाळी डॉ . का...