प्रवास
नवीन दिवस उजाडतो आणि मावळतो, वर्ष सुरू होतं आणि संपत, आयुष्याचही तसचं काहीसं! प्रत्येकाचा प्रवास निराळा... प्रत्येकाची सुरुवात वेगळी आणि शेवटही! आणि गंमत म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी आपल्या हातात नसतात. पण ह्या दोन्ही गोष्टी जोडणारी अख्खी वाट कशी चालायची हे आपल्याच हातात असतं. ह्या सगळ्यामध्ये महत्वाची भूमिका बजावतो तो आपला दृष्टिकोन आणि त्याला अनुसरून केलेली मेहनत! ह्या दोघांची जोडगोळी प्रवासात असलेले अडथळे पार करायला मोलाची मदत करते. असाच कधीतरी कुठेतरी प्रवास करत असताना त्या त्या क्षणी मनात रेखाटलेली काही धावती विचारचक्र. विंडो सीट लोकल मधली विंडो सीट मला मात्र नेहमीच एक खुप मोठा प्रश्न पाडते. एकमेकांसमोर तोंड करून असलेल्या लोकल मधल्या सीट्स, काही ट्रेन ज्या दिशेला चाललीय त्या दिशेला तों...