Posts

Showing posts from 2019

लिखाणाबद्दलचं 'लिखाण'

Image
खूप दिवस काही लिहिलं नाही की एक वेगळीच तगमग सुरू होते मनात. काही तरी लिहिलं पाहिजे असं सतत वाटत राहतं आणि काय लिहावं हा प्रश्न सतावत राहतो. खरंतर लिहीणं हे खूप जास्त विचार करून लिहीण्यापेक्षा ते सरळ सोप्पं त्या क्षणाला वाटेल तसं नैसर्गिक असावं असं मला नेहमी वाटतं... अगदी candid! उगाच बढेजाव नाही, नाटकीपणा नाही, जे वाटलं ते सरळ-साध्या भाषेत कागदावर उतरवत जावं. कागदावर उतरवत असताना सुद्धा शेवट कधीच माहीत नसतो पण त्या शेवटाकडे चाललेला प्रवास मात्र खूप नव्या जाणीवा करून देत असतो. जाणीव... मेंदूत चालू असलेल्या गुंतागुंतीची, जाणीव... सतत चालू असलेल्या विचारचक्राची, जाणीव... पटपट कागदावर उमटणाऱ्या अक्षरांची आणि जाणीव... घडू पाहणाऱ्या नवनिर्मितीची! ह्या लिखाणाचा प्रवास आणि आपला जगण्याचा प्रवास यात खूप साम्य जाणवत मला... उद्या काय आहे माहीत नाही... पण आज जे वाटतंय ते करून मोकळं व्हावं... होणाऱ्या चुका नंतर निस्तराव्यात, पण त्या क्षणाचा आनंद घ्यावा. कशी गंमत असते ना, खूप दिवस विचार करून, एखादा विषय समजून-उमजून, त्यावर अभ्यास करून लिहिणं आणि सहज सुचलं च्या caption खाली बिनधास्...

घाव

उसवण्याचे दुःख आता, काही नवीन नाही जोडणे पुन्हा नव्याने, आता होणे नाही हुरहुर नेमकी ही, उरी साठलेली अस्वस्थता मनाच्या, कोपऱ्यात दाटलेली संवाद केव्हढासा, स्वतःशीच उमटलेला हा प्रवास रोजचाच, निःशब्द होत चाललेला घालमेल ही तरी, डोकावून पाहणारी क्षितिजे हळवी तरी, व्याकुळतेने डोलणारी भास आभास सारे हे, ठाव मनीचा नाही पुन्हा पुन्हा सतावणारा, हा घाव कोवळा नाही -गौरी अजय चिंदरकर १६/०९/२०१९

जगणं!

Image
खूप दिवसांपासून फोनच्या गॅलरीमधे पडून असलेला , साधारण वर्षभरापूर्वी विरार लोकलमधे काढलेला हा फोटो दिसला. ते समोरच्या सीटवर बसलेल्या आजींचे सुरकुतलेले हाथ अस्वस्थ करत होते... गुपचूप फोटो काढून पुढे कधीतरी यावर काहीतरी लिहू म्हणून फोनमधे जपून ठेवलेला तो फोटो. हातावरच्या सुरकुत्या त्यांच्या वयाची साक्ष देत होत्या. टापटीप नेसलेली साडी, हातातलं छानसं घड्याळ, शांतपणे हातावर हात ठेवून बसलेल्या आजींच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास त्यांचा चेहरा अजून खुलवत होता. शरीर थकलं असेल कदाचित पण त्यांच्याकडे बघून एक वेगळीच ऊर्जा मिळतं होती. कारण काहीही असो पण अगदी त्या वयातही विरार लोकलमधे, अगदी मुंबईच्या 'peak hours' मधे चढण्याच्या त्यांच्या हिंमतीचं कौतुक वाटलं. नंतर विचार केला तर लक्षात आलं की ह्या आजी एकट्याचं नाहीयत... आजूबाजूला असे असंख्य आजी आजोबा आहेत ज्यांच्यासाठी वय हा फक्त एक आकडा आहे... प्रत्येकाची जगण्याची कारणं वेगवेगळी आहेत... कोणी रोजच्या जेवणासाठी कष्ट करतंय, कोणी रिटायरमेंट नंतरचा वेळ घालवण्यासाठी तर कोणी शिकण्यासाठी... होय, शिकण्यासाठी! आयुष्यातल्या उतारवयातल्य...

उन्वान

एक मुसाफिर मिला था सफर में किसी मुंतजिर सा लग रहा था आंखों में अलगसी एहतिमाल थी और चेहरे पर ज़ुल्मत लगता तो वो मुम्ताज़ था लेकिन शायद ताराज के रास्ते पे था अफ़कार थी या रंज या सिर्फ एक उज़्र क्या मफ़हूम था उसकी बातों का जो उसकी खराब बख्त का जवाज़ दे रही थी काविश थी उसकी अबद रहने की या फिर अपने हिदायत के क़तरोंसे तिश्नगी बुझाने की तजस्सूस से देखा उसकी बे-ज़ार आँखों को एहसास दिखाया उसने उसकी ख़ुलूस का नक्श छोड़ के गया मेरे दिल पे वो था उन्वान किसी किताब का - गौरी अजय चिंदरकर 19/05/2019 For reference- मुंतजिर- प्रतीक्षित, एहतिमाल- अनिश्चितता, ज़ुल्मत- अंधकार, ताराज- बरबादी, अफ़कार- चिंता, रंज- दुःख, उज़्र- बहाना, मफ़हूम- अर्थ, बख्त- भाग्य , जवाज़- औचित्य (justification), काविश- प्रयास, अबद-अनन्तकाल, हिदायत- मार्गदर्शन, क़तरा- बून्द, तिश्नगी- प्यास, तजस्सूस- जिज्ञासा, बे-ज़ार- उदासिन, ख़ुलूस- निर्मलता, नक्श- छाप, उन्वान- शीर्षक

रेषा

Image
हाती एक कागद कोरा त्यावर एक रेषा कधी इथे तर कधी तिथे वळवळणारी ! माहित नाही तिला शांतता अधीरतेने नुसती धावणारी रिकामी जागा शोधत फक्त उमटणारी! कधी नव्हे ती जरा पहुडली आजूबाजूला पाहू लागली निशब्दता एका क्षणी स्वतःच्याच गुंत्यात अडकलेली! कुठे घट्ट गाठ, कुठे स्वतःच अडवलेली वाट, कुठे उगाच घुसखोरी, एव्हढं करूनही पाटी मात्र कोरी! ऐक जरा, क्षणभर थांब जरा, वेग तुझा आवर जरा! थबकलीस? हरकत नाही. थांबव आता गुदमरणं स्वतःच्याच कोड्यात दोन पावलं टाक जरा माघारी नको उगाच जिंकण्याची घाई! संयमाने चाल पुन्हा तुझा तोच रस्ता पण आता नव्या ध्येयवेडाने अनुभवांच्या शिदोरीने! पुन्हा एक कागद कोरा पुन्हा त्यावर एक रेषा मुक्तपणे विहरणारी सांगे जगा गोष्ट न्यारी! -गौरी अजय चिंदरकर 11/03/2019 P.S. Inspired by Project Semicolon. (To know more about Project Semicolon visit: https://projectsemicolon.com/ )

निमित्त 'कोसला'चे...

Image
स्थळ: इंटरसिटी एक्सप्रेस, ठाणे स्टेशन वेळ: सकाळी ७ वाजून १४ मिनिटे वेळेवर ट्रेन प्लॅटफॉर्मला लागली. आधीच आरक्षण केलेलं असल्यामुळे मी नियोजित डी६ डब्यात माझ्या सिटजवळ गेले. अगोदरच माझ्या बाजूच्या सिटवर खिडकीपाशी एक आजोबा वर्तमानपत्र वाचत बसले होते. मी तिथे पोहोचताच त्यांनी एका निरर्थक कटाक्षाने पाहिलं आणि पुन्हा आपलं काम करू लागले. मी बॅगेतून माझा स्कार्फ आणि कोसला बाहेर काढून माझ्या सिटवर ठेवली आणि बॅग कॅरियर वर ठेवली. आजोबांनी माझ्या सिटवरची कोसला पाहिली आणि एक छानसं स्मितहास्य करत माझ्याकडे पाहिलं. कदाचित त्याचंही कोसलाशी काही जवळचं नातं असावं किंवा ह्या एका पुस्तकामुळे त्यांचा माझ्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला असावा. बऱ्याच दिवसांपासून कोसला वाचण्याची इच्छा होती. योगायोगाने माझ्या एका ऑफिस सहकार्याने मला ती भेट दिली. कोसला वाचून पूर्ण झाली. खरंतर कोसला बद्दल खूप काही ऐकून होते पण कोसला वाचण्यापेक्षाही ती अनुभवता आली याचा आनंद जास्त आहे. जवळजवळ ५५ वर्षांची कोसला! पण अजूनही तिचं अस्तित्व का टिकून आहे याची जाणीव पुस्तक वाचताना होते. सुरुवातीला थोडीशी जड वाटणारी अ...