रिहर्सल डायरीज #2 म्युझियम
नेहमीप्रमाणे त्यादिवशीसुद्धा सगळ्यांच्या आधी मी रिहर्सलला पोहोचले . डॉ . काका काहीतरी शोधत बसलेले . त्यातच त्यांनी एक - दोन जुनी पत्र दाखवली . त्यांनी जपून ठेवलेल्या लिखित स्वरूपातल्या आठवणींबद्दल ते मला सांगत होते . मला सुद्धा एक - दोन जुन्या स्क्रिप्टस वाचायच्या होत्या त्या ही मी त्यांच्याकडून घेतल्या . ' संडे हो या मंडे ' आणि ' अँड दि ऑस्कर गोज टू ' ही डॉ . काकांनी लेखन - दिग्दर्शन केलेल्या नाटकांपैकी दोन नाटकं ज्यात मीही काम केलेलं . असाच विषय निघाला आणि ' अँड दि ऑस्कर गोज टू ' मधल्या ' म्युझियम ' ची आठवण झाली . जुन्या नाटकातल्या संवाद , नेपथ्य अश्या बऱ्याच गोष्टी आठवल्या . त्यानंतर रिहर्सल सुरु झाली . थोडंफार वाचन झालं त्यावर इतरांच्या प्रतिक्रिया , अजून काही नवीन संकल्पना कश्या उभारता येतील यावर चर्चा झाली आणि मग सुरु झाल्या त्या गप्पा ! गप्पा ! आमच्या रिहर्सलचा अनिर्वाय भाग . त्या कधी - कश्या - कुठून सुरू होतील याचा काही नेम ...