Posts

Showing posts from 2022

चकवा!

Image
  सतत दिसत राहणारा तो एक ठिपका मन अस्वस्थ करत राहतो आणि आपल्याला काही कळायच्या आत आपण त्यावर क्लिक केलेली असते. शेकडो stories अश्याच पडलेल्या असतात. आपण जेव्हढ शक्य असले तेव्हढ्या वेगात क्लिक करत राहतो, फक्त तो एक ठिपका घालवण्यासाठी. आपलं लक्ष कुठेच नसतं, ना त्या story कडे, ना त्या story मधल्या कंटेंट कडे. शेवटी दमून कंटाळून ते तसचं अर्धवट टाकून बाहेर पडतो. त्या stories च्या दुनियेतून आणि समोर आ वासून उभी असते ती feed! काही वेळापूर्वी ज्या वेगात stories seen करण्यासाठी धडपडत असतो त्याच वेगात पुन्हा feed scroll करायला सुरुवात करतो. पुन्हा तेच, लक्ष नसतं त्या पोस्ट कडे, त्याच्या caption कडेही आणि कॉमेंट्स तर खूप आधीच दुर्लक्षित केलेल्या असतात. हे चालूच राहतं निरर्थक!  खरचं काही अर्थ आहे का ह्याला? एका ॲप वरून दुसऱ्या ॲपवर, बदललेला असतो तो फक्त इंटरफेस. पुन्हा scroll-click चा ससेमिरा चालूच राहतो. आपण गोल-गोल फिरतच राहतो. असंच तास- दोन तास घालवल्यावर लक्षात येतं किंबहुना ते आधीच आलेलं असतं पण आता जाणीव होते ती एकाद्या शारीरिक वेदनेची! गेल्या तासा- दोन तासात अख्खं जग फिरून आलेलो अस...