Posts

Showing posts from July, 2019

जगणं!

Image
खूप दिवसांपासून फोनच्या गॅलरीमधे पडून असलेला , साधारण वर्षभरापूर्वी विरार लोकलमधे काढलेला हा फोटो दिसला. ते समोरच्या सीटवर बसलेल्या आजींचे सुरकुतलेले हाथ अस्वस्थ करत होते... गुपचूप फोटो काढून पुढे कधीतरी यावर काहीतरी लिहू म्हणून फोनमधे जपून ठेवलेला तो फोटो. हातावरच्या सुरकुत्या त्यांच्या वयाची साक्ष देत होत्या. टापटीप नेसलेली साडी, हातातलं छानसं घड्याळ, शांतपणे हातावर हात ठेवून बसलेल्या आजींच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास त्यांचा चेहरा अजून खुलवत होता. शरीर थकलं असेल कदाचित पण त्यांच्याकडे बघून एक वेगळीच ऊर्जा मिळतं होती. कारण काहीही असो पण अगदी त्या वयातही विरार लोकलमधे, अगदी मुंबईच्या 'peak hours' मधे चढण्याच्या त्यांच्या हिंमतीचं कौतुक वाटलं. नंतर विचार केला तर लक्षात आलं की ह्या आजी एकट्याचं नाहीयत... आजूबाजूला असे असंख्य आजी आजोबा आहेत ज्यांच्यासाठी वय हा फक्त एक आकडा आहे... प्रत्येकाची जगण्याची कारणं वेगवेगळी आहेत... कोणी रोजच्या जेवणासाठी कष्ट करतंय, कोणी रिटायरमेंट नंतरचा वेळ घालवण्यासाठी तर कोणी शिकण्यासाठी... होय, शिकण्यासाठी! आयुष्यातल्या उतारवयातल्य...