निमित्त 'कोसला'चे...
स्थळ: इंटरसिटी एक्सप्रेस, ठाणे स्टेशन वेळ: सकाळी ७ वाजून १४ मिनिटे वेळेवर ट्रेन प्लॅटफॉर्मला लागली. आधीच आरक्षण केलेलं असल्यामुळे मी नियोजित डी६ डब्यात माझ्या सिटजवळ गेले. अगोदरच माझ्या बाजूच्या सिटवर खिडकीपाशी एक आजोबा वर्तमानपत्र वाचत बसले होते. मी तिथे पोहोचताच त्यांनी एका निरर्थक कटाक्षाने पाहिलं आणि पुन्हा आपलं काम करू लागले. मी बॅगेतून माझा स्कार्फ आणि कोसला बाहेर काढून माझ्या सिटवर ठेवली आणि बॅग कॅरियर वर ठेवली. आजोबांनी माझ्या सिटवरची कोसला पाहिली आणि एक छानसं स्मितहास्य करत माझ्याकडे पाहिलं. कदाचित त्याचंही कोसलाशी काही जवळचं नातं असावं किंवा ह्या एका पुस्तकामुळे त्यांचा माझ्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला असावा. बऱ्याच दिवसांपासून कोसला वाचण्याची इच्छा होती. योगायोगाने माझ्या एका ऑफिस सहकार्याने मला ती भेट दिली. कोसला वाचून पूर्ण झाली. खरंतर कोसला बद्दल खूप काही ऐकून होते पण कोसला वाचण्यापेक्षाही ती अनुभवता आली याचा आनंद जास्त आहे. जवळजवळ ५५ वर्षांची कोसला! पण अजूनही तिचं अस्तित्व का टिकून आहे याची जाणीव पुस्तक वाचताना होते. सुरुवातीला थोडीशी जड वाटणारी अ...