Posts

Showing posts from December, 2018

सायकल

Image
भस्सकन कागद ओढवा... हाताला मिळेल ते पेन घेऊन घासाघीस सुरू करावी. डोक्यातल्या, मनातल्या, हृदयातल्या असंख्य अव्यक्त भावना आपल्याला काही समजण्यापूर्वीच कागदावर जाऊन चिकटाव्यात. नेहमी काय लिहावं हा मोठा प्रश्न पडत असतो पण पुढे लिखाण कोणत्या दिशेने घेऊन जावं हा साधा विचारही न करता जे वाटेल ते फक्त लिहत सुटावं... व्यक्त व्हावं... मोकळं व्हावं... असं फार कमी वेळा होतं. आजही तसंच काहीसं दिशाहीन... संदीप खरे आणि सलील कुलकर्णी ह्यांचा प्रमुख पाहुणे म्हणून समावेश असलेला 'सूर नवा ध्यास नवा ' च्या एक भागाचा व्हिडिओ पाहिला. एक भावनांवर प्रेम करणारा मनुष्य तर दुसरा शब्दांना धरून सूर लावणारा... ( अर्थात हेही संदीप खरेंच्या शब्दात) आणि त्यातही संदीप खरेंनी सादर केलेली 'सायकल' ही कविता. एका बापाचं भावविश्व संदीप नेहमीच त्याच्या कवितेतून मांडत आलाय. प्रत्येक वेळी ते भिडतं आणि अभिप्राय म्हणून दोनच गोष्टी होतात, एक म्हणजे डोळ्यातून वाहणारी आसवं आणि दुसरी म्हणजे निशब्दता! आपोआप बॅक ऑफ द माईंड विचारचक्र सुरू होतात.कवितेतील चपखल शब्द त्रास देतातच पण त्याहूनही जास्त विचार करायला ...