रंग आकाशाचे...
मी गावात वाढलेली आणि त्यातही मुख्य गावापासून ३ - ४ किलोमीटर अंतरावर माझं घर . आजूबाजूला घरांची जास्त दाटीवाटी नाही . प्रसन्न शांतता , अंगणात उभं राहिल्यावर दूरवर दिसणारा परिसर . दूर डोंगरावर असलेल्या आंब्याच्या बागा , गावाला जोडणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेला काळा दगड , हळूच माडाच्या झाडाआड लपलेलं दूरवर दिसणारं एखाद दुसरं घर , रस्ता जास्त रहदारीचा नसल्याने कधीतरी जाणारी वाहनं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दिवसरात्र दिसणारं मोकळं विस्तीर्ण आकाश . सकाळी घरासमोरून उदयाला ...