Posts

Showing posts from November, 2017

पत्र

Image
पत्र ! पूर्वीपासून चालत आलेलं आणि काळाच्या ओघात मागे पडलेलं संवादाच एक साधन , किंबहुना एक प्रभावी माध्यम . फार पूर्वी राजे - महाराज्यांच्या काळात निरोप पोहोचवण्यासाठी खलिता पाठवत . दोन काठ्यांमध्ये कापड अडकवून त्यावर हस्तलिखित केलेला मजकुर म्हणजे अगदी ' रॉयल कारभार ' ! त्यानंतरच्या काळात पत्रांचा नियमित वापर केला जाऊ लागला . घरी पत्र घेऊन येणाऱ्या पोस्टमनकाकांची आतुरतेने वाट बघितली जाऊ लागली . ८ - १० दिवस हा साधारण पत्र पोहोचण्यासाठी लागणारा वेळ . पण किती उत्सुकता , कौतुक त्या पत्राचं . किती तो आनंद !  कधी सुखाची तर कधी दुःखाची बातमी घेऊन येणारी ती पत्र , कधी कौटुंबिक तर कधी सामाजिक , कधी बाहेरगावी राहणाऱ्या कर्त्या पुरुषाने घरी लिहिलेलं खुशालीच पत्र तर कधी प्रेयसिने चोरून आपल्या प्रियकराला लिहिलेलं पत्र . जगाच्या पटलावरच्या वेगवेगळ्या व्यक्तिरेखा पण त्यांना जोडणारा त्यावेळच्या महत्वाचा दुवा म्हणजे पत्र ! हळूहळू नवे शोध लागत गेले आणि पत्र मागे पडू ...

स्लॅमबुक

Image
असं म्हणतात की , काही गोष्टी ह्या रात्रीच्या निरव शांततेत लिहायच्या असतात . हीच शांतता थेट हृदयाला जाऊन स्पर्श करते . मेंदूच्या गुंतागुंतीच्या तर्क - वितर्कांना जरा बाजूला ठेवून मनातल्या गोष्टींना व्यक्त होण्याची संधी देते . रोजच्या जीवनात बऱ्याच गोष्टी घडत असतात पण त्यातही काही गोष्टी , माणसं लक्षात राहतात खूप चांगल्या   आठवणीं च्या स्वरूपात . अश्याच आठवणींचा खजिना म्हणजे ' स्लॅमबुक '. आज कपाट आवरताना जुनी स्लॅमबुक सापडली . जुनी म्हणजे तशी फार जुनी नाही पण ७ - ८ वर्षांपूर्वी बनवलेली . मी एक जुन्या डायरीचं स्लॅमबुक मध्ये रूपांतर केलेलं . आधी ती बघून मलाच ज रा हसू आलं . आपली डायरी सगळ्यात जास्त भरली पाहिजे म्हणून काही जणांकडून अगदी जबरदस्तीने भरून घेतलेली माहिती होती त्यात . पण त्याहून भारी म्हणजे काही जणांनी अगदी मनापासून मनमोकळेपणाने लिहिलेलं खूप काही सापडलं . स्लॅमबुक मधल्या वेगवेगळ्या मुद्द्यावर सगळ्यांनी लिहिलेली उत्तरं , कविता , चांगले विचार सगळं पुन...