Posts

Showing posts from 2017

रिहर्सल डायरीज #4 'बूज'च्या निमित्ताने…

Image
प्रत्येक गोष्टीची एक प्रक्रिया असते आणि हीच प्रक्रिया माणूस म्हणून समृद्ध करत असते . खरंतर एखादी गोष्ट आपण करतोय तर त्याच output हे महत्त्वाचं असतंच पण त्याहीपेक्षा त्या output पर्यंत पोहोचण्याची क्रिया - प्रकिया सुद्धा खूप महत्त्वाची असते . ह्याच महिन्यात ' मित्र , शिरगाव ' ची ' बूज ' नावाची नाट्यकृती तयार झाली आणि पुणे , कणकवली अशा ठिकाणी प्रयोगसुद्धा झाले . ' बूज ' च्या निमित्ताने खूप वेगवेगळ्या गोष्टी अनुभवल्या त्याचाच हा थोडक्यात केलेला लेखाजोखा . एक दिवस अण्णा दादाचा फोन आला , खुल्या गटासाठी एकांकिका बसवायची आहे तूला यायला जमेल का ? आणि इथूनच माझा आणि बूज चा प्रवास सुरु झाला . मित्र शिरगाव म्हणजे माझं दुसरं कुटुंब . अगदी लहानपणापासून म्हणजे मला समजतही नव्हतं अशा वयात असतानापासून मित्र , शिरगाव मधली प्रत्येक व्यक्ती तितकीच जवळची आणि आपुलकीची ! मग काय एकदा एकांकिका बसवायची ठरली आणि मग रिहर्सलला सुरुवात झाली . रोज संध्याकाळी डॉ . का...

रिहर्सल डायरीज #3 आनंद नवनिर्मितीचा!

Image
नाटक  ! कधी ठरवून केलेलं , कधी सहज सुचलेलं तर कधी ओघात चालू असलेलं . नाटक बसवण्याची पण प्रत्येक दिग्दर्शकाची आपली अशी वेगळी शैली . कधी एकांकिका , कधी दोन अंकी नाटक तर कधी नाट्यछटा . कलाकारांचे गट करून त्यांना विषय द्यायचा आणि दिलेल्या वेळात त्या विषयावर सादरीकरण करायचं असा सुरुवातीच्या काही रिहर्सलचा आमचा ठरलेला साचा . बऱ्याचदा गटांना वेगवेगळा विषय दिला जातो पण काही वेळा ह्याला अपवाद म्हणून एकाच विषयावर सादरीकरण हो तं . खरी मज्जा असते ती बालगटातील सादरीकरणांची . त्यांची विचार करायची पद्धत , इतरांचा विचार न करता मनात येणाऱ्या गोष्टी नाटकाच्या रूपाने मांडण्याची कला . मग त्यात सुद्धा नाटकाचे बारकावे लक्षात ठेवत सादरीकरण सजवण्याचा केलेला निरागस प्रयत्न . कधी ' बालपण ' ह्या विषयावर सादरीकरण करताना छोटा ओंकार घाडी आजोबांची भूमिका साकारतो . त्याच्या आजोबांनी सांगितलेल्या गोष्टी तो त्याच्या नाटकातल्या नातवंडांना सांगतो तर कधी ' पाहुणे ' सादर करत...